Home | Maharashtra | Kokan | Thane | uddhav thackeray criticized on deputy chief minister ajit pawar

आत्मक्लेश करून चूक सुधारता येत नाही : उद्धव ठाकरे

प्रतिनिधी | Update - Apr 21, 2013, 03:05 AM IST

आत्मक्लेश करून चूक सुधारता येत नाही. दिवंगत माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचा वारसा अजित पवारांनी सांगू नये.

  • uddhav thackeray criticized on deputy chief minister ajit pawar

    अलिबाग- आत्मक्लेश करून चूक सुधारता येत नाही. दिवंगत माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचा वारसा अजित पवारांनी सांगू नये. त्यांच्या काकांनीच यशवंतरावांच्या पाठीत खंजीर खुपसला होता, अशी घणाघाती टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी माणगाव येथे शनिवारी केली. शिवसेनेच्या निर्धार सभेत ते बोलत होते. या वेळी युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे, मनोहर जोशी आदींची उपस्थिती होती.

    ठाकरे म्हणाले, सिंचन प्रकल्पांच्या किमतीत वाढ होण्यासाठी सुनील तटकरे जबाबदार आहेत. शिवसेनेची सत्ता आल्यास महारष्‍टाला देशात नंबर एकचे राज्य बनवू. गृहमंत्री आर. आर. पाटील बेळगावातील मराठी जनतेच्या पाठीशी असतील तर शिवसेना त्यांच्या पाठीशी उभी राहील, असेही त्यांनी या वेळी सांगितले.

Trending