आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चोर समजून दुस-यालाच ठोकले, जमावाच्या मारहाणीत युवक ठार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ठाणे - कल्याणजवळील उंबर्डे गावात गावक-यांनी चोर समजून एका २५ वर्षीय युवकाला जबर मारहाण केली, त्यात त्याचा मृत्य झाला. शुक्रवारी सकाळी बाजारपेठ पोलिसांनी गावक-यांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

शुक्रवारी पहाटे शोभा वानखेडे यांच्या घराचे दार ठोठावण्यात आले. दार उघडल्यानंतर एक अनोळखी तरुण दारासमोर उभा होता. त्याला चोर समजून वानखेडे यांनी आरडोओरड सुरु केली. त्यांचा आवाज एकून शेजारी जमा झाले. गावक-यांनी त्याला विचारपूस केली मात्र, त्याने काहीच माहिती न दिल्यामुळे ग्रामस्थांनी त्याला विजेच्या खांबाला बांधून बेदम चोप दिला. ग्रामस्थांनी मिळेल त्या वस्तूने त्याला मारहाण केली. या गडबडीतच पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिस घटनास्थळी दाखल होईपर्यंत त्या तरुणाचा मृत्यू झाला होता.

पोलिसांनी गावक-यांच्या तावडीतील मृतदेह ताब्यात घेतला आणि उत्तरीय तपाणीसाठी पालिकेच्या हॉस्पिटलमध्ये पाठवला. त्या तरुणाची ओळख अजून पटलेली नाही. या प्रकरणी गावक-यांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप कोणालाही अटक मात्र झालेली नाही.