आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शिवाजी महाराजांचा 'वाघ्या' पुन्हा रायग़डावर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ठाणॆ - संभाजी ब्रिगेडने काल हलवलेला शिवाजी महाराजांच्या वाघ्या कुत्र्याचा पुतळा प्रशासनाने आज पुन्हा रायगडावर बसवला. इतिहासात वाघ्याचा कुठल्याच प्रकारचा उल्लेख नसल्याचे कारण सांगून हा पुतळा काल ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी हलवला होता. या प्रकरणी पोलिसांनी ब्रिगेडच्या 73 कार्यकर्त्यांना अटक केली आहे.
कार्यकर्त्यांवर दरोडा घातल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी रायगडावर चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. यापूर्वी ब्रिगेडने सहा जूनपूर्वीच हा पुतळा तेथून हलवण्याची मागणी केली होती.