आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ठाण्यात पाणीमोर्चा: सत्ताधारी शिवसेनेला घरचा आहेर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ठाणे- दिवा वासियांना तीव्र पाणी टंचाईची झळ बसत असताना त्यांना एमआयडीसीमार्फत वाढीव 5 एमएलडी पाणीपुरवठा करण्यात यावा, या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने पालिका मुख्यालयावर शिवसेनेतर्फे भव्य पाणी मोर्चा काढण्यात आला. पालिकेवर शिवसेनेची सत्ता असताना त्यांच्या माजी नगरसेवकाला हा मोर्चा काढावा लागत असल्यामुळे सत्ताधार्‍यांना हा घरचा आहेर असल्याची चर्चा पालिका वर्तुळात सुरु आहे.

जानेवारी 2012 मध्ये एमआयडीसीमार्फत वाढीव पाच एमएलडी पाणीपुरवठा करण्याची योजना मढवी यांनी मंजूर करून घेतली होती.परंतु एक वर्ष उलटूनही पाण्याचा एक थेंबही दिवा वासियांना मिळाला नाही. प्रशासनाच्या याकृतीच्या निषेधार्थ हा मोर्चा काढण्यात आला. मोर्चात महिलांची संख्या लाक्षणिय होती.

शिवसेनेचे कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, सभागृहनेते नरेश म्हस्के, माजी आमदार सुभाष भोईर, माजी महापौर अशोक वैत‍ी यांच्या नेतृत्त्वाखाली माजी नगरसेवक रमाकांत मढवी हे मोर्चात सहभागी झाले होते.