आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डोंबिवलीत डोक्यात दगड घालून पतीकडून पत्नीची हत्या

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ठाणे- डोंबिवलीत एका तरुणाने त्याच्या पत्नीच्या डोक्यात दगड घालून तिची निर्घृण हत्या केली आहे. घटनेनंतर फरार झालेला आरोपी रोशन घोरपडे पोलिसांच्या शरण आला आहे. ही घटना अहिरे रोडवर सोमवारी घडली.

यापूर्वी आरोपी रोशन याने त्याची आईची हत्या केली होती. आता त्याने पत्नीच हत्या केली आहे. तरुणाने हे निर्घृण कृत्य का केले असावे, हे अद्याप कळू शकलेले नाही.

रोशनचा काही महिन्यांपूर्वीच प्रेमविवाह झाला होता. लग्नानंतर रोशनच्या पत्नीचे आणि त्याच्या आईचे भांडण होत होते. या भांडणामुळे रोशनची पत्नी माहेरी निघून गेली होती. त्यामुळे संतापलेल्या रोशनने 26 जानेवारीला आईच्या डोक्यात वरवंटा घालून हत्या केली. तर तीन दिवसांनी माहेरी गेलेल्या पत्नीला ठाकुर्ली स्टेशनजवळ बोलावून तिचीसुद्धा डोक्यात दगड घालून हत्या केली. पोलिसांनी आरोपीला न्यायालयात उभे केले असता न्यायालयाने त्याला पाच दिवसांची कोठडी सुनावली आहे.