आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकणकवली - पश्चिम घाटातील पर्यावरण संवर्धनासाठी माधव गाडगीळ आणि कस्तुरीरंगन या दोन समित्या स्थापण्यात आल्या. पुढे आणखी समित्या येतील, परंतु त्यात सर्वसामान्यांचा विचार न झाल्यास पर्यावरणाचा समतोल राखला जाणार नाही, असे आमदार प्रमोद जठार यांनी सांगितले.
नगरवाचनालयाच्या हीरक महोत्सवी वर्षाच्या सांगता प्रसंगी ठेवण्यात आलेल्या 'आज पर्यावरण विचार-एक नित्यकर्म ' या परिसंवादात आमदार जठार बोलत होते. यावेळी वाचनालयाचे अध्यक्ष वि.शं. पडते, महेश काणेकर, जान्हवी जोशी, कौस्तुभ ताम्हाणकर, डॉ कुमुद करंदीकर आदींची उपस्थिती होती. जठार म्हणाले, पर्यावरणवादी आणि अणुशास्त्रज्ञ यांच्या भूमिकेमुळे कोकणातील नागरिक गोंधळला आहे. ताम्हाणकर आणि करंदीकर यांनीही यावेळी आपले विचार परिसंवादात मांडले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.