आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Woman’s Hands Put In Boiling Oil For Sexual Relations With Uncle

पोलिस ठाण्यातच जात पंचायतीचे क्राैर्य; महिलेला उकळत्या तेलातून नाणे काढायला लावले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
माळशिरस - चुलत्याशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून पारधी समाज जात पंचायतीने विवाहितेला उकळत्या तेलातून नाणे काढावयास भाग पाडले. मंगळवारी (दि. १९) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास माळशिरस पोलिस ठाण्याच्या नव्या इमारतीच्या आवारातच मानवी मनाचा थरकाप उडवणारा हा प्रकार घडला. मात्र, पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली. उलट असा काही प्रकारच घडला नसल्याचे पोलिस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

मंगळवारी सायंकाळी पोलिस ठाण्याच्या नव्या इमारतीच्या आवारात पारधी समाजाची जात पंचायत भरली होती. एका विवाहितेचा तिच्या चुलत्याशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून ही जात पंचायत भरवण्यात आली होती. अनैतिक संबंध नसल्याचे सिद्ध करण्यासाठी भयानक परीक्षा देण्याची पारधी समाजात अघोरी प्रथा आहे. उकळत्या तेलातून नाणे काढल्यास निर्दोष आणि तसे न केल्यास दोषी असा हा प्रकार आहे. या प्रकरणातही पंचांनी तसा निर्णय दिला. त्यानुसार विवाहितेने उकळत्या तेलातून नाणे काढल्यानंतर जात पंचायतीने तिला निर्दोष म्हणून घोषित केले. हा सारा प्रकार पोलिस ठाण्याच्या आवारातच सुरू होता. मात्र, पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली. पोलिस उपनिरीक्षक अभिजित चौधरी हे पोलिस ठाण्यात होते. जात पंचायतीची माहिती असूनही त्यांनी याकडे दुर्लक्ष केले. बुधवारी रात्री उशिरापर्यंतही या प्रकरणी गुन्हा दाखल झाला नव्हता. उलट असा काही प्रकार घडला नसल्याचे पाेलिस सांगतात.
पाेलिस ठाणे परिसरातील घटना, पाेलिसांकडून हात वर
पारधी समाजातील दोन कुटुंबात तक्रार झाली होती. ते मिटवण्यासाठी ते जमले होते. यात महिलेचा विषय नव्हता, असे पाेलिस निरीक्षक कृष्णकांत खराडे यांचे मत अाहे, तर मी पोलिस ठाण्यात नव्हतो. मी पिलीव गेलाे होतो. सायंकाळच्या सुमारास माळशिरसमध्ये आलो. असा काही प्रकार घडला नाही. पोलिस ठाण्यात अशी काही नोंद नाही, असे पाेलिस उपनिरीक्षक अभिजित चौधरी यांनी सांगितले.