Home | Maharashtra | Kokan | Thane | Women Clerk arrested redhanded accepting bribes

ठाण्‍यात लाच स्वीकारताना महिला लिपिकास रंगेहाथ अटक

दिव्‍य मराठी | Update - Dec 17, 2016, 06:11 AM IST

प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र देण्याच्या बदल्यात लाचेची मागणी करणाऱ्या महिला लिपिकास शुक्रवारी उरणच्या विशेष भूसंपादन कार्यालयातून अटक करण्यात आली

  • Women  Clerk arrested redhanded accepting bribes
    ठाणे | प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र देण्याच्या बदल्यात लाचेची मागणी करणाऱ्या महिला लिपिकास शुक्रवारी उरणच्या विशेष भूसंपादन कार्यालयातून अटक करण्यात आली. १९८८ मध्ये नवी मुंबईत सिडकोच्या निर्मितीवेळी तक्रारदाराची जमीन भूसंपादनात गेली होती. त्यासंबंधी प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र मिळावे म्हणून तक्रारदाराने २ डिसेंबर २०१६ रोजी भूसंपादन कार्यालयात अर्ज केला. येथील महिला लिपिकाने प्रमाणपत्राच्या बदल्यात २४ हजार रुपयांची मागणी केली. २३ हजारांत तडजोड करून संबंधिताने लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार सापळा रचत लिपिकास २३ हजारांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले.

Trending