आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोतवालांवर भार; सजा पडले ओस

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिल्लोड - सज्जावरची कामे सुरळीत करण्यासाठी नव्याने नियुक्त करण्यात आलेल्या कोतवालांवर तहसील कार्यालयातील कामांचा भार टाकण्यात आल्याने मूळ उद्देशालाच हरताळ फासला गेला आहे. तलाठी सजावरची कामे करण्यासाठी कोतवालांची नेमणूक असली तरीही कर्मचार्‍यांची संख्या अपुरी असल्याचे कारण देत पंधरा कोतवालांना तहसील कार्यालयातच काम देण्यात आले आहे. १३२ तालुक्यांच्या गावात ४५ तलाठी सजे असल्याने तेवढ्याच कोतवालांची आवशकता आहे; परंतु सध्या ३३ कोतवालच कार्यरत आहेत. मार्च २०१५ मध्ये नव्याने बारा तलाठ्यांची भरती करण्यात आल्याने आज ही संख्या २१ वरून ३३ वर गेली; परंतु कोतवाल भरतीचा मूळ उद्देश मात्र साध्य होऊ शकला नाही.

नव्याने भरती करण्यात आलेल्या तीन महिलांसह बारा व पूर्वीचे तीन असे एकूण १५ कोतवाल तहसील कार्यालयात काम करतात. त्यामुळे सजावर अठराच तलाठी आहेत. विशेष म्हणजे ई-डिस्ट्रिक्ट सेवेमुळे तहसील कार्यालयातील कर्मचार्‍यांचा भार कमी झालेला असतानाही तहसील कार्यालयातच नियुक्ती देण्यात आलेली आहे. या प्रकारामुळे तलाठी सजावरील महसुली कामे, आधार कार्ड मतदार यादीशी जोडणे, महसुली दप्तराचे संगणकीकरण करण्याची कामे रखडली आहेत. याशिवाय अवैध गौण खनिज वाहतूक व अन्य कामांवर नियंत्रण ठेवणे तलाठ्यांना अवघड होऊन बसले आहे. या संदर्भात तलाठी संघटनेने महिनाभरापूर्वीच कोतवालांना सजावर पाठवण्याची मागणी केली होती; परंतु अद्याप त्यांच्या मागणीची पूर्तता झालेली नाही.

सजावर पाठवू
सजावर काम करण्यास अडचणी येत असल्याने तहसीलदारांकडे कोतवालांना सज्जावर पाठवण्याची मागणी करण्यात आली आहे. लवकरच सजावर पाठवण्याची कारवाई करू, असे त्यांनी सांगितले आहे. - रवींद्र कुलकर्णी, तालुका अध्यक्ष, तलाठी संघटना
बातम्या आणखी आहेत...