आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चाळीसगावात नाशिकच्या १० कुख्यात गुंडांना अटक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चाळीसगाव - शहरात दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या नाशिक येथील १० जणांना पोलिसांनी अटक केली. शहरातील हॉटेल ब्रिज कार्नर येथे २८ रोजी सकाळी १० वाजता कारवाई करण्यात आली. अटक करण्यात आलेेले दहाही आरोपी हे अनेक गुन्ह्यांत सहभागी असून त्यांच्याकडे गावठी पिस्टल, ६ जिवंत काडतुस, चाकू, दोर, मिरची पूड, लोखंडी रॉड व महिंद्रा कंपनीची स्कॉर्पिओ गाडी जप्त करण्यात आली आहे.

अाराेपी दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाल्याने अपर पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, उपविभागीय अधिकारी अरविंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक आदिनाथ बुधवंत, सहायक पोलिस निरीक्षक राजेंद्र इंगळे, पोलिस उपनिरीक्षक विजयकुमार बोत्रे, पाेलिस हेड काॅन्स्टेबल शशिकांत पाटील, राहुल पाटील, संदीप जगताप यांनी हॉटेलवर सकाळी १० वाजता सापळा रचून दरोड्याच्या तयारी असलेले अर्जुन संपत पगारे (३२, मल्हार खान अशोकस्तंभ), संतोष अनिल जगदाणे (३१, रा.मल्हार खान), अक्षय रवींद्र साळवे (२१, मोठा राजवाडा, वडाळा नाका), विशाल चंद्रकांत साळवे (३४, मल्हार खान अशोकस्तंभ),
मनीष प्रेमजी रेवर (२८, रा.३९१ आंबेडकर कॉलनी, रेडक्रॉस), तुषार दिगंबर सूर्यवंशी (२८, ित्रमूर्ती चौक, शिवशक्ती), जितेंद्र भगवान काळे (२५, धनगर गल्ली, रविवार पेठ), विकी शामलाल कुटे (२०, मल्हार खान), विजय संजय बैसाने (२२) व राजू सुभाष साळुंखे (२४, मल्हार खान, सर्व राहणार, नािशक) यांना ताब्यात घेतले. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलिस ठाण्यात भारतीय हत्यार कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक राजेंद्र इंगळे करीत आहेत. या कारवाईमुळे शहरात खळबळ उडाली आहे.
बातम्या आणखी आहेत...