आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नांदूरा येथील हनुमानाच्या १०५ फुटी मूर्तीला रिमोटने चढवला हार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नांदुरा - हनुमान जयंतीनिमित्त नांदुरा येथील जगप्रसिद्ध १०५ फुटी हनुमानाच्या मूर्तीला ३५० किलोचा फुलांचा ५५ हजार रुपये किमतीचा हार स्वयंचलित छोटेखानी वायर रोपवरून रिमोटद्वारे कळ दाबून शनिवारी चढवण्यात आला. या वेळी उपस्थित पवनसुताच्या भाविकांनी ‘ओम नमो भगवते वायुनंदनाय नम:’ असा जयघोष केला. गेल्या १४ वर्षांपासून ३५० किलोचा हार हनुमान जयंतीला मूर्तीला अर्पण करण्याची प्रथा आहे.
मूर्तीसाठी लागले ८०० क्विंटल लोखंड

आंध्र प्रदेशातील पेद्दापुरम येथील जॉन बाबू या मूर्तिकाराने हनुमानाची ही १०५ फुटी मूर्ती २१० दिवस अथक प्रयत्न करून पूर्णत्वास नेली. आठ नोव्हेंबर २००१ रोजी गोवर्धन पीठ जगन्नाथ पुरीचे जगद्गुरू शंकराचार्य श्री श्री १०८ निश्चलानंदजी महाराज यांच्या हस्ते या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली होती. मूर्ती बनवण्यासाठी ८०० क्विंटल लोखंड, ३७५ ट्रक सिमेंट वापरण्यात आले.