आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठवाड्यात 1 हजार 53 मतदान केंद्रे संवेदनशील

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड- मराठवाड्यातील अाठ जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषद अाणि पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी ९८ लाख १६ हजार १२९ मतदार असून ११ हजार ७२६ मतदान केंद्रे अाहेत.  यात सुमारे एक हजार ५२ संवेदनशील तर ८५ अतिसंवेदनशील केंद्रे अाहेत. संपूर्ण मराठवाड्यात कुठेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी यंत्रणा तैनात केली अाहे, अशी मािहती राज्याचे निवडणूक अायुक्त जे.एस. सहारिया यांनी दिली.

मराठवाड्यातील निवडणुकांच्या तयारीचा सहारिया यांनी आढावा घेतला. त्यानंतर बोलताना ते म्हणाले की, निवडणूक प्रक्रिया सुरळीत होण्यासाठी भरारी पथके, आचारसंहिता कक्ष, व्हिडिअाे पथक, चेक पोस्ट अादी उपाययोजना केल्या जात अाहेत.  सर्वाधिक संवेदनशील व अतिसंवेदनशील मतदान केंद्रे  बीड जिल्ह्यात (३५१) अाहेत.त्यानंतर अाैरंगाबाद-१७५, परभणी -१७१, जालना - ११२, िहंगाेली- १०५,लातूर-९६, उस्मानाबाद - ७०, नांदेड -५७ अशी एकूण एक हजार १३७ केंद्रांची संख्या अाहे. मराठवाड्यातील सर्व निवडणूक  यंत्रणेला सतर्क राहण्याचे निर्देश दिल्याचेही त्यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...