आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाच वेगवेगळ्या अपघातांत 11 ठार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड/जालना - वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या पाच अपघातांत मराठवाड्यातील 11 जणांचा मृत्यू झाला. जालन्यात व-हाडाचा टेम्पो उलटून 3, बीडमध्ये उसाचे ट्रॅक्टर आणि सिमेंटच्या ट्रकची धडक होऊन दोन, हिंगोलीत कारच्या धडकेने दोघे, तर अंदरसूलजवळ वैजापूरचे दोघे आणि परभणीत बहीण-भावांचा मृत्यू झाला आहे.
जालना ते राजूरदरम्यान वºहाड घेऊन जाणारा टेम्पो दुचाकीला धडकून उलटल्याने तीन ठार, तर 37 जण जखमी झाले. बने खान पठाण (45, थिगळखेडा, ता. भोकरदन), झहिदा बेग रफिक सय्यद (40, येवता) व सिकंदर पठाण (45, वाढोणा, ता. जाफराबाद) अशी मृतांची नावे आहेत. बीडच्या तेलगावहून परळीकडे जाणारे उसाचे ट्रॅक्टर (एमएच 44 डी 258) व सिमेंटच्या ट्रकच्या धडकेत दोन तरुण ठार, तर दोघे जखमी झाले. सिरसाळ्याजवळ हा
उर्वरित . पान 2
अपघात झाला. ट्रकचालक केशव श्रीरंग तिडके (21, रा. शेंडगा, ता. गंगाखेड, जि. परभणी), ट्रॅक्टर क्लीनर सुनील दामोदर राठोड (20, रा. रामनगर तांडा, ता. परळी, जि. बीड) अशी मृतांची नावे आहेत. ट्रॅक्टरचालक रमेश घनश्याम राठोड (रा. रामनगर तांडा) व मारुती गायकवाड अशी जखमींची नावे आहेत.