आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 11 Lakh Cost Rice Seized At Parali, Divya Marathi

अकरा लाखांचा तांदूळ पकडला; तिघांवर गुन्हा दाखल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परळी- स्वस्त धान्य दुकानातील अकरा लाख रुपये किमतीचा ४२० पोते तांदूळ काळ्या बाजारात जात असल्याची माहिती मिळताच परळी पोलिसांनी बुधवारी सायंकाळी पाच वाजता तांदूळ जप्त केला आहे. या प्रकरणी नायब तहसीलदारांच्या तक्रारीवरून परळी शहर पोलिस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. दोघांना ताब्यात घेतले.
परळी शहरातील उड्डाण पुलावरून बुधवारी सायंकाळी पाच वाजता ट्रक (जीजे -२५ यू ९९४१) निघाला होता. पोलिसांनी हा ट्रक पाहिल्यांनतर त्यांना संशय आला. पोलिसांनी ट्रक थांबवून तपासणी केली. त्यात अकरा लाख रुपये किमतीचे ५० किलो वजनाचे ४२० तांदळाने भरलेले पोते आढळले.

पोलिसांनी ट्रक चालक हरीश नारायण राठोड व किशन गळाभाई मोरे (रा.दोघे गुजरात) या दोघांची चौकशी केली. त्यांनी समाधानकारक उत्तरे दिली नाहीत. त्यामुळे पोलिसांनी महसूल अधिकाऱ्यांना या ट्रकची माहिती दिली. महसूल प्रशासनाने घटनास्थळी भेट देऊन तपासणी केली तेव्हा ट्रकमधील तांदूळ रेशनचा असल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी येथील नायब तहसीलदार बाबूराव रूपनर यांनी परळी शहर ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून तिरुपती अॅग्रो फूड इंडस्ट्रीज जलालपूरचे संचालक विश्वनाथ वैजनाथ नरवटे (रा.दौनापूर), ट्रकचालक हरीश राठोड व किशन मोरे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास पोलिस निरीक्षक सोपान निघोट हे करीत आहेत.