आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गळाटी, लेंडीच्या पुराने ११ गावांचा संपर्क तुटला, तीन दिवसांपासून परभणीत पावसाचा जोर कायम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पालम ते पुयणी या मार्गावरील गळाटी नदीला पूर आल्याने पाच गावांचा संपर्क तुटला आहे. - Divya Marathi
पालम ते पुयणी या मार्गावरील गळाटी नदीला पूर आल्याने पाच गावांचा संपर्क तुटला आहे.
परभणी - जिल्ह्यात गुरुवारी (दि.२२) तिसऱ्या दिवशीही पावसाचा जोर कायम असून दिवसभराच्या उघडिपीनंतर सायंकाळी पुन्हा जोरदार पावसाने हजेरी लावली. दरम्यान, पालम तालुक्यात मागील दोन दिवस झालेल्या मुसळधार पावसाने गळाटी व लेंडी नदीला पूर आल्यामुळे ग्रामीण भागातील ११ गावांचा संपर्क तुटला आहे.

हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार मंगळवारपासून जिल्ह्यात परतीच्या पावसाचे जोरदार आगमन झाले आहे. बुधवारी व गुरुवारी दिवसभर उघडीप दिल्यानंतर दोन्ही दिवशी सायंकाळी पाचच्या सुमारास जोरदार पाऊस झाला. हा पाऊस जिल्ह्यात सर्वदूर कमी-अधिक प्रमाणात राहिला आहे. पालम तालुक्यातील आडगाव, नाव्हा, पुयणी, वनभुजवाडी या गावांचा संपर्क पुयणीच्या पुलावरून पाणी वाहत असल्याने तुटला होता. पालम ते सोमेश्वर रस्त्यावरील पुलावरून सातत्याने पाणी वाहू लागल्याने सोमेश्वर, आरखेड, उमरथडी, घोडा, सायळा या गावांचाही संपर्क तुटला होता. मागील दोन दिवसांच्या पाण्याने या पुलांवरील पाणी अद्यापही ओसरलेले नाही. गटाळी नदी व लेंडी नदी दुथडी भरून वाहत आहे. बुधवारी मध्यरात्रीच्या पावसाने तर या गावांतील नागरिक गावातच अडकून पडले होते. अशा स्थितीत भगवान रोडगे या युवकाने तर काही शिक्षकांसह ग्रामस्थांना रस्ता ओलांडण्यासाठी मदत केली. पाण्यामुळे या गावांची एसटी बससेवा गेल्या पाच दिवसांपासून बंद झाली आहे.

नांदेड जिल्ह्यात सरासरी ८८ टक्के बरसात
नांदेड |२२ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वा. संपलेल्या मागील २४ तासांत एकूण २७१.३८ मिलिमीटर पाऊस झाला असून जिल्ह्यात दिवसभरात सरासरी १६.९६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी ८४६.४९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

बीड जिल्ह्यात भिजपाऊस, कपाशीवर ‘मर’
बीड | जिल्ह्यात आठ दिवसांपासून कोसळणारा पाऊस तूर, उडीद, बाजरी, या पिकांसाठी जीवदान देणारा ठरला आहे. कापूस व सोयाबीन ही नगदी पिके सध्या भीजपावसामुळे धोक्यात सापडली आहेत. मर रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने कपाशी पिवळी पडली असल्याने चिंता वाढली आहे.
पुढे वाचा... नऊ मंडळांत अतिवृष्टी
बातम्या आणखी आहेत...