आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भरधाव टँकरच्या धडकेने 11 वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विद्यार्थ्याला चिरडणारा टँकर संतप्त नागरिकांनी पेटवून दिला. - Divya Marathi
विद्यार्थ्याला चिरडणारा टँकर संतप्त नागरिकांनी पेटवून दिला.
वैजापूर - शिष्यवृत्ती परीक्षेचा पेपर देण्यासाठी सायकलवरून जात असलेल्या  शाळकरी विद्यार्थ्यांला भरधाव टँकरने चिरडल्याची घटना रविवारी सकाळी पुरणगाव - वैजापूर रस्त्यावरील खंबाळात घडली.  संतप्त नागरिकांनी  टँकर जाळला.  
 
शुभम बाळासाहेब लांडे (११, खंबाळा) असे अपघातात ठार झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. इयत्ता पाचवीच्या वर्गात शिक्षण घेत असलेला शुभम शिष्यवृत्ती परीक्षेचा पेपर देण्यासाठी शेजारच्या डवाळा गावातील परीक्षा केंद्र गाठण्यासाठी सकाळच्या सुमारास सायकलवरून निघाला होता. घरापासून काही अंतरावरच त्याला  टँकर (एमएच १५ बी १८५७) ने धडक िदली. जखमी झालेल्या विद्यार्थ्याला परिसरातील नागरिकांनी तातडीने उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले. 
बातम्या आणखी आहेत...