आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टीव्ही पाहून मुलाने घेतला गळफास, फाशीची नक्कल करण्याच्या प्रयत्नात गेला जीव

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अंबाजोगाई - शाळा सुटल्यानंतर घरी आलेल्या अकरा वर्षांच्या मुलाने दोन भावंडांना टीव्हीत कशी फाशी घेतात याची नक्कल करून दाखवण्याचा प्रयत्न केला. यात दोरीच्या लोखंडी आडूला गळफास बसून त्याचा मृत्यू झाला. शेख साजेद शेख वाजेद (११, सदर बाजार, अंंबाजोगाई) असे मृताचे नाव आहे. ही घटना सोमवारी रात्री घडली.
सदर बाजार भागातील फ्लॉवर्स क्वार्टरमध्ये शेख वाजेद शेख जलील हे वीटभट्टी कामगार राहतात. सोमवारी ते पत्नीला बरोबर घेऊन मजुरीसाठी बाहेर गेले होते. शाळा सुटल्यानंतर चौथीच्या वर्गात शिकणारा त्यांचा मुलगा शेख साजेद, त्याची मोठी बहीण व भाऊ असे तिघे घरी आले. घरात त्यांनी सायंकाळी टीव्ही सुरू केला. टीव्ही पाहत असलेला शेख साजेद हा मध्येच उठला. टीव्हीत बघा कशी फाशी घेतात हे मी तुम्हाला करून दाखवतो, असे तो बहीण व भावास म्हणाला. साजेदने हातात दोरी घेऊन ती घरातील लोखंडी आडूला बांधली. त्यानंतर फास गळ्यात अडकवला. फाशीची नक्कल करून दाखवत असतानाच त्याला खराखुरा फास बसला. यातच त्याचा मृत्यू झाला. दोन भावंडांनी हा प्रकार शेजाऱ्यांना सांगितला. शेजाऱ्यांनी वाजेद यांना फोनवरून ही माहिती दिली. पती-पत्नी घरी आल्यानंतर हा प्रकार त्यांना दिसला.

जिवावर बेतले
सोमवारी सायंकाळी शेख साजेद शेख वाजेद याच्यासह त्याची मोठी बहीण शेख तरन्नुम वाजेद (१५) व लहान भाऊ शेाख माजेद शेख वाजेद (३) हे तिघे एकत्रितपणे टीव्ही पाहत होते. मध्येच शेख साजेद याने फाशीची नक्कल केली. ती त्याच्या जिवाशी आली.
बातम्या आणखी आहेत...