आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्जमाफीसाठी 12.78 कोटी जिल्हा बँकेच्या खात्यावर; कर्जखात्यावर रक्कम जमा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उस्मानाबाद- शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या प्रक्रियेचा रुतलेला गाडा हळूहळू पुढे सरकू लागला आहे. पहिल्या ५१ लाभार्थी शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यावर रक्कम जमा केल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात ४९१२ जणांची ग्रीनलिस्ट जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार आतापर्यंत ४०५१ कर्जदार शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यावर शासनाकडून रक्कम जमा करण्यात आली आहे. 


कर्जमाफीच्या घोषणेनंतर सहकार व महसूल मंत्री या दोघांनीही दिवाळीपर्यंत कर्जमाफीला पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा होईल. तसेच यामध्ये राज्यात सर्वात प्रथम लाभ उस्मानाबाद व यवतमाळ जिल्ह्याला मिळेल असेही जाहीर केले होते. परंतु, दिवाळीत काही कर्जमाफीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाली नाही. त्यानंतर याच मंत्र्यांनी पुन्हा पंधरा दिवसांत ही प्रक्रिया पूर्ण हाेईल असे सांगितले. मात्र, प्रत्यक्षात ही रक्कम खात्यावर जमा होण्यासाठी नोव्हेंबर महिना उजाडावा लागला. त्यातही पहिल्या टप्प्यात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या केवळ ५८ जणांची यादी आली आणि त्यातीलही ७ नावे तांत्रिक चुकांमुळे गळाली. परिणामी अवघ्या ५१ जणांच्या खात्यावर २३ लाख रुपयांची रक्कम जमा करण्यात आली. तेव्हापासून राज्यपातळीवरून दुरुस्तीच्या याद्या जिल्हा बँकेत जमा होत. दुरुस्तीनंतर पुन्हा राज्य शासनाकडे पाठविणे असा नित्यक्रमच बनला होता. दरम्यान चार दिवसांपूर्वी नव्याने ४९१२ जणांची ग्रीनलिस्ट जाहीर करण्यात आली आहे.  सततच्या यादीतील त्रुटी आणि माहितीतील तफावतीमुळे जिल्हा बँकेचे कर्मचारीही बेजार झाले असून गेल्या महिनाभरापासून जवळपास दोन डझन अधिकारी व कर्मचारी शेतकऱ्यांची यादी दुरुस्त करणे व पडताळणी करण्याचे काम रात्रंदिवस करताना दिसत आहेत.

 

 १३५४ शेतकऱ्यांची रक्कम जमा नाही
४०५१ कर्जदार शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याकाठी १२.७८ कोटी रुपये आले. यातील १३५४ कर्जदारांच्या खात्यावर त्यांच्या कर्जाची रक्कम ५ हजारांपेक्षा कमी असल्याने अशा खात्यावर रक्कम जमा करू नये असे निर्देश आल्याचे समजते. जिल्ह्यातील १३५४ खाते रक्कम प्राप्त होऊनही अद्याप थकबाकीतच आहेत. त्यांची एकूण रक्कम १२ लाख २३,४६० रुपये इतकी आहे.

 

ग्रीनलिस्ट ४९१२ ची रक्कम जमा ४०५१ जणांची

जिल्ह्यातून जिल्हा बँकेच्या ८९ हजारपेक्षा जास्त कर्जदार शेतकऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी स्वावलंबन योजनेंतर्गत कर्जमाफीसाठी अर्ज केला आहे. या अर्जांची पडताळणीचे काम सध्या सुरू आहे. त्यानुसार आतापर्यंत ४९१२ लाभार्थ्यांची ग्रीनलिस्ट शासनाकडून जाहीर करण्यात आली आहे. त्यापैकी ४०५१ शेतकऱ्यांच्या कर्जखात्यावर १२ कोटी ७८ लाख ४६ हजार ६७ रुपये जमा करण्यात आले .

 

पूढील स्‍लाइडवर पाहा, कर्ज माफ झालेल्या शेतकऱ्यांची संख्या...

 

बातम्या आणखी आहेत...