आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • 12 Vidrihi Marathi Sahitya Samelan Parbhani Issue

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सामान्यांच्या प्रतिक्रिया: धर्मचिकित्सेशिवाय मानवी विकास होणे शक्य नाही

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

परभणी- धर्मचिकित्सेशिवाय मानवी विकास होणे शक्य नाही, अशी प्रतिक्रिया बाराव्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या दुसर्‍या दिवशी रविवारी (दि. नऊ) झालेल्या गटचर्चेच्या सत्रात उपस्थितांनी व्यक्त केली.

महात्मा फुले मुलींचे हायस्कूलच्या प्रांगणात शनिवारपासून सुरू झालेल्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनात दोन दिवस भरगच्च कार्यक्रम झाले. आदिवासी लोककलांच्या सादरीकरणाने संमेलनाला सुरुवात झाली. नंदुरबार येथील लोककलावंतांनी सादर केलेल्या कला प्रकारांनी शहर दुमदुमले. आदिवासी पद्धतीचे लग्न विचारमंचावर सादर झाले. यात विविध कलावंतांनी विविध भूमिका साकारल्या. डोंगर्‍यादेवी उत्सवातील निसर्गपूजाही सादर करण्यात आली. त्यानंतर झालेल्या गटचर्चेच्या पहिल्या गटाला डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या खुनी-सनातनी, हा विषय देण्यात आला होता. धर्मचिकित्सेशिवाय मानवी समुदायाचा विकास होणे शक्य नसल्याची प्रतिक्रिया उपस्थितांनी दिली. धर्मचिकित्सा, अंधर्शद्धेच्या माध्यमाने धर्मभोळी जनतेच्या होणार्‍या शोषणाविरोधात जाणार्‍या, लढणार्‍या समाजहितैषी प्रवृत्तींना, व्यक्तींना ठेचण्यासाठी सनातनी, धर्मांध प्रवृत्तींनीच दाभोलकरांचा खून केला असल्याचे नमूद करताना शासनाने वेळीच बंदोबस्त न केल्याने हा प्रकार घडला आहे, असेही मत व्यक्त करण्यात आले.