आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सव्वाशे जावयांना एकत्रित धोंडे जेवण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर - हातीराखी बांधून कपाळी कुंकुम तिलक लावून लेकी-जावयांचे औक्षण करीत संस्कृतीचा धागा अधिक घट्ट करण्याचा बोलका प्रयत्न रविवारी मुरूडच्या तुळजाभवानी मंगल कार्यालयात झाला. निमित्त होते राजस्थान सभेच्या वतीने लेकी- जावयांसाठी आयोजित सामूहिक धोंडे जेवणाचे. या आगळ्यावेगळ्या सोहळ्यात १३१ जोडप्यांनी हजेरी लावली. विशेष म्हणजे दक्षिण आफ्रिकेत असलेले एक जावईबापू आपल्या सौभाग्यवतीसह कार्यक्रमस्थळी आले.
अधिक मासात लेक - जावयांना धोंडे जेवण देण्याची प्रथा हिंदूधर्मात प्रचलित आहे. त्यामुळे हा मान त्यांना दिला जातो. मुरूड शहरात राजस्थानी समाजाची संख्या मोठी असून तेथील राजस्थानी सभा विविध समाजोपयोगी कार्यक्रमाचे आयोजन करीत असते. दोन महिन्यांपूर्वी झालेल्या बैठकीत सभेचे डॉ. विजयकुमार चांडक, गणेश सोनी मनोज जोशी यांनी सामूहिक धोंडे जेवणाचा विषय काढला. वर्षानुवर्षे गावातील लेकींची एकमेकींची होणारी भेट या कार्यक्रमामुळे होईल यातून आपापसातला स्नेह अधिक दृढही होईल ही भूमिकाही चांडक यांनी विशद केली सर्वांनीच या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाला होकार भरला. सर्व लेकी-जावयांचे फोेन, मोबाइल नंबर, मेल्स पदाधिका-यांनी घेतले घरातील ज्येष्ठ जावईबापूंना कार्यक्रमाबाबत सांगून त्यांंना धोंडे जेवणाचे आमंत्रण देण्यात आले होते.

जोहान्सबर्गवरून आले
डाॅ.चांडक यांनी दीड महिन्यांपूर्वी आम्हाला या कार्यक्रमाची फोनवरून कल्पना दिली. मला आनंद झाला. आम्ही तिकिटे बुक केली. या कार्यक्रमामुळे एकाच ठिकाणी मैत्रिणी नातेवाइकांना भेटता आले. माझे हे पहिलेच धोंडे जेवण होते. माहेरच्यांनी दिलेली ही सरप्रायझिंग गिफ्ट वाटली नम्रतारूपेश सोमाणी, जोहान्सबर्ग