आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागदमध्ये एकाच रात्री 13 दुकाने फोडली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागद - येथे रविवारी रात्री बसस्थानक परिसरातील एक नव्हे दोन नव्हे, तर तब्बल तेरा दुकाने चोरट्यांनी फोडल्याचा प्रकार सोमवारी सकाळी उघडकीस आला.   

साई दर्शन कलेक्शन, भोलेनाथ कृषी केंद्र, माऊली कृषी केंद्र, रामभरोसे लाँड्री, ग्रीन प्लांट, रिद्दी गारमेंट, तिरुपती क्लिनिक, योगेश ऑनलाइन, महावीर किराणा, राजश्री लॉटरी, माऊली क्लिनिक, गायत्री फोटो आदी दुकानांचे शटर उचकटून व कुलपे तोडून चोरट्यांनी डाव साधला.
 
 याप्रकरणी दुकान मालक विकास राजपूत यांच्या दुकानातून अंदाजी तीस हजार व चांदी, माऊली क्लिनिकमधून सही केलेला कोरा चेक असे अनेकांचे साहित्य लंपास झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. याप्रकरणी जमादार यांनी पंचनामा केला.
बातम्या आणखी आहेत...