आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षकाच्या 13 वर्षीय मुलाची आत्महत्या, पोलिसांना ब्ल्यू व्हेल गेमचा संशय

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आष्टी - आष्टीत शिक्षक दांपत्याच्या सातवीतील मुलाने राहत्या घरी पडद्याच्या रॉडला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सायंकाळी घडली. दानिश अफझल शेख (१३) असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे.
 
पोलिसांनी सुरुवातीला ‘ब्ल्यू व्हेल’ गेमच्या नादात त्याने आत्महत्या केली असावी, असा संशय व्यक्त केला. नंतर मात्र खोडकरपणाच्या नादात हा प्रकार घडला असावा, असा अंदाजही व्यक्त केला. दुसरीकडे, त्याच्या वडिलांनी ब्ल्यू व्हेलमुळे आत्महत्या झाल्याचा इन्कार केला आहे.
आष्टी शहरातील विनायकनगरातील अफझल शेख हे पांढरी जिल्हा परिषद शाळा, तर पत्नी मिनहाज शेख या कडा येथील शाळेमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांचा मुलगा दानिश बुधवारी शाळेतून घरी परतल्यानंतर अंगणात खेळत होता. काही वेळाने तो घरात गेल्यानंतर  मोबाइलवर गेम  खेळू लागला. यानंतर  सायंकाळी पावणेसात वाजता घरात कोणी नसल्याचे पाहून तो ड्रॉइंग रूम व स्वयंपाकघराच्या मधोमध असलेल्या खोलीत गेला.  त्याने सोफासेटवर उशा ठेवत पडद्याच्या रॉडला ओढणीने गळफास लावून आत्महत्या केली.
 
मोबाइलला होता पासवर्ड :
पोलिसांनी दानिशचा मोबाइल जप्त केला आहे. त्यातील डाटा तपासण्यासाठी बीडच्या सायबर सेलची मदत घेतली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. नातेवाइकांनुसार दानिश हा सतत मोबाइलमध्ये गेम खेळत असे. त्याने  मोबाइलमध्ये ब्ल्यू व्हेल गेम डाऊनलोड करून घेतल्याचा अंदाज नातेवाइकांनी व्यक्त केला आहे.

मृत दानिश हा खोडकर स्वभावाचा होता : पाेलिस
दानिश हा खोडकर स्वभावाचा होता. तो झाडावरून उडी मारणे, दरवाजाला लटकणे अशा प्रकारच्या खोड्या करत असे. यातूनच त्याला आत्महत्येचे गांभीर्य न कळाल्याने गळफास बसून मृत्यू झाला असावा, असा आमचा अंदाज आहे.
- हर्षवर्धन गवळी, पोलिस निरीक्षक, आष्टी
 
बातम्या आणखी आहेत...