आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघात वार 15 ठार : लातूर अकोला जिल्ह्यांत दोन कुटुंबांवर काळाचा घाला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
साखरपुड्याला जाणार्‍या जीपचा अपघात, नवरदेवासह आठ ठार
मूर्तिजापूर (जि. अकोला) - साखरपुड्यासाठी आर्वी येथे निघालेल्या बुलडाण्यातील पाटील कुटुंबीयांवर बुधवारी सकाळी च्या सुमारास काळाने झडप घातली. त्यांच्या क्रुझरची ट्रकची जोरदार धडक होऊन झालेल्या अपघातात सात जण जागीच ठार, तर ज्याचा साखरपुडा होता त्या उपवर मुलाचा अमरावती येथे रुग्णालयात मृत्यू झाला. तेथेच गंभीर जखमी असलेल्या क्रुझर चालकावर उपचार सुरू आहेत. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक वरील मधापुरी फाट्याजवळ ही भीषण घटना घडली. यात जीपचा अक्षरश: चुराडा झाला.

मलकापूर तालुक्यातील तांदूळवाडी येथील माणिक नारायण पाटील (वय ६७) यांचा मुलगा अरविंद पाटील (२७) याचा आर्वी येथे बुधवारी साखरपुडा होणार होता. यासाठी पाटील कुटुंबीय त्यांचे काही स्नेही हे क्रुझरने (एमएच २८ वाय ८४८९) आर्वीच्या दिशेने निघाले होते. सकाळी आठच्या सुमारास नागपूरकडून भरधाव वेगात येणार्‍या ट्रकची (एमएच ०४ ईएल ७४००) क्रुझरची मधापुरी फाट्याजवळ जोरदार धडक झाली. या भीषण अपघातात माणिक पाटील, सचिन माणिक पाटील (वय १८), प्रभाकर शेणू बोरले (७०), वसंत माधव पाटील (६०, रा. तांदूळवाडी), प्रकाश रामचंद्र पाटील (५७, रा. दताळा), भास्कर रामा किनगे (५५, रा. खरबडी, ता. मोताळा) भास्कर नीलकंठ पाटील (६८, रा. बुलडाणा) यांचा जागीच मृत्यू झाला, तर नवरदेव मुलगा अरविंद माणिक पाटील याचा अमरावती येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. क्रुझरचालक शंकर टप (रा. मलकापूर) याच्यावर अमरावती येथे उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती गंभीर आहे.

महामार्गावर पोलिसांचा ताफा
महामार्गावरमदतीसाठी अपघात पाहण्यासाठी मोठी गर्दी जमली होती. त्यातून वाहतूक बराच काळ ठप्प होती. घटनास्थळी पोलिस अधीक्षक चंद्र किशोर मीणा, अप्पर पोलिस अधीक्षक नीकेश खारमुटे पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी नंदकुमार काळेंसह पोलिसांचा ताफा दाखल झाला होता.

अपघाताची तीव्रता हेलावणारी
अपघात एवढा भीषण होता की, क्रुझर चक्काचूर होऊन महामार्गापासून ५० ते ६० फूट दूर फेकली गेली. अपघातानंतर ट्रकचालक फरार झाला. ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात क्रुझरची ट्रकची समोरासमोर धडक झाली. समोरून वेगात क्रुझर येत असल्याचे दिसताच ट्रकचालकाने २० फुटांवरून जोरात ब्रेक दाबत वाहन आणले. त्यात ट्रकची चाके निखळून पडलेली असतानाही वाहन घसरत बरेच पुढे आल्याच्या खुणा घटनास्थळी दिसून आल्या. काही क्षणातच ‘होत्याचे नव्हते’ करणारे काळाचे रूप पाहायला मिळाले.

स्वप्नांचा चुराडा
साखरपुड्यासारख्या मंगल क्षणातील चित्र आणि भावी आयुष्याची स्वप्ने पाटील कुटुंबीयातील सर्वच जण रंगवत होते. परंतु, नियतीला हे मान्य नसावे. काही काळानंतर लग्नघर होणार्‍या घराचे रूप भयाण झाले. वडील, दोन मुलांसह तिघांचे मृतदेह त्या घरात आले. माणिकराव यांना तीन मुले असून, दोन तांदूळवाडीत, तर अरविंद हा पुण्यात एका कंपनीत नोकरीला होता. तो नोकरीवर असल्यानेच त्याचे प्रथम लग्न करण्याचे ठरले होते. मृत सचिन हा गावातच वेल्डिंगचे काम करत होता. या तिघांच्या जाण्याने पाटील कुटुंबीयांच्या स्वप्नांचा चुराडा झाला.

पुढे वाचा, रिक्षा-ट्रक अपघातात लातूरचे सात जण ठार; तिघांचे संसार उघड्यावर...