आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यामध्‍ये ऊसाच्या रसाची टाकी फुटली; 15 कामगार जखमी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड - ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या मालकीच्या परळी तालुक्यातील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यामधील उसाच्या रसाची टाकी फुटून १५ कर्मचारी भाजल्याची घटना शुक्रवारी दुपारी 3 वाजता घडली आहे. यात ५ जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे.


शुक्रवारी दुपारी पांगरी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावर नेहमीप्रमाणे काम सुरू असताना रसाची टाकी फुटली. त्‍यामुळे टाकीच्या खालच्या भागातुन मोठ्या प्रमाणात उकळता रस बाहेर फेकला गेला. या टाकीत नेहमी 120 डिग्री सेल्सिअस तापमानावर उकळता उस असतो.

रस अंगावर पडल्याने येथे काम करणारे तंत्रज्ञ व कामगार असे एकुण 9 जण गंभीर भाजले आहेत. जखमींना तातडीने परळी येथील उपजिल्हा रूग्णालय व अंबाजोगाई येथील स्वाराती रूग्णालयात हलवण्यात आले आहे. पाच जणांनी प्रकृती चिंताजनक आहे.


राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षा असुन मागील वर्षी हा कारखाना बंद होता. गेल्या महिन्यातच या साखर कारखान्यावर उसाचे गाळप सुरू झाले.

 

बातम्या आणखी आहेत...