आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बलात्कारानंतर मुलीला शाळेतून काढून टाकले, लग्नाचे आमिष दाखवून जवानाने केले लैंगिक शोषण

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लातूर- शेजारी राहणाऱ्या लष्करी जवानाने अापल्या मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी पाेलिसात तक्रार दाखल झाल्याच्या कारणावरून शाळेतून तिचे नाव काढण्यात अाले, अशी तक्रार पीडित मुलीच्या पालकांनी पाेलिसांकडे केली अाहे. मात्र पाेलिसांनी अधिक चाैकशी केली असता पीडित मुलीच्या भावाने बलात्काराची तक्रार दाखल हाेण्यापूर्वीच काैटुंबिक कारण देत मुलीचा दाखला काढल्याचे पाेलिस व शाळेचे म्हणणे अाहे.  


देवणी तालुक्यातील एका तांड्यावरील दोन कुटुंबात गेल्या पाच- सहा महिन्यांपासून वाद सुरू आहे.  २९ अाॅगस्ट राेजी यापैकी एका कुटुंबातील अल्पवयीन मुलीने दुसऱ्या कुटुंबातील लष्करात जवान म्हणून कार्यरत असलेल्या युवकाविराेधात बलात्काराची तक्रार पाेलिस ठाण्यात दाखल केलमी हाेती. त्याच्यावर बलात्काराचा गुन्हाही दाखल झाला हाेता. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी पीडित मुलीला शाळेतून काढून टाकण्यात अाल्याची तक्रार तिच्या पालकांनी केली अाहे. या मुलीवर बलात्कार झाल्याचे कारण त्यासाठी शाळेने दिल्याचे पालकांचे म्हणणे अाहे. मात्र   संबंधित मुलीच्या भावाने बलात्काराचा गुन्हा दाखल होण्याच्या एक महिना अाधीच  शाळेत लेखी अर्ज देऊन कौटुंबिक कारणामुळे मुलीचा दाखला काढल्याचे पाेलिसांचे म्हणणे अाहे. 

 

तक्रार दाखल करण्‍यासाठी पोलिसांनी मागितली लाच...
- सूत्रांकडून मिळालेली माहितीनुसार, पीडिता येथील एका शाळेत शिकते. चार महिन्यांपूर्वी आरोपी जवानाने तिला लग्नाचे आमिष दाखवले होते. त्यानंतर त्याने तिचे अनेकदा लैंगिक शोषण केले. काही दिवसांपूर्वी पीडितेने आईला आपबिती सांगितली.
- पीडिता आणि तिची आई आरोपीविरुद्ध तक्रार करण्‍यासाठी गेली असता पोलिसांनी तिला 50 हजार रुपयांची लाच मा‍गितली. नंतर एसपी शिवाजी राठोड यांच्याकडे दाद मागितल्यानंतर पोलिसांत आरोपीविरोधात तक्रार दाखल केली आहे.

 

पुढील स्लाइडवर वाचा... शाळा प्रशासनाने पीडितेचे अॅडमिशन केले रद्द...

बातम्या आणखी आहेत...