आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पैठणला वाळूच्या 14 ट्रॅक्टरसह 16 जण पोलिसांच्या ताब्यात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पैठण- उपविभागीय पोलिस अधिकारी बच्चन सिंह यांच्‍या विशेष पथकाने शुक्रवारी पहाटे चारच्या सुमारास गोदावरी नदीपात्रातील पाटेगाव पुलानजीक व आयटीआय कॉलेजच्या मागील भागात गोपनीय वाळू उपसा करणाऱ्यांवर छापा टाकला. या छाप्यादरम्यान १४ वाळूचे ट्रॅक्टर, १० मोटारसायकली, ११ मोबाइलसह एकूण ३० लाख ८० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून २८ जणांवर पैठण पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले. त्यापैकी १६ जणांना पोलिसांनी अटक केली. तर काही जण फरार होण्यात यशस्वी झालेत.
पैठणच्या गोदावरी नदीपात्रातून बेसुमार अवैध वाळूचा उपसा गेल्या दोन महिन्यांपासून सुरू आहे. याकडे तहसील व पोलिसांचे दुर्लक्ष झाल्याने सर्रास वाळू उपसा सुरू असल्याचे वृत्त "दिव्य मराठी'ने अनेकदा प्रसिद्ध केले होते. त्यानंतर तहसीलदारांनी वाळू विरोधी पथकाची स्थापना केली. मात्र, या पथकाने एक महिन्यात दोन-तीन वाळूच्या वाहनाशिवाय ठोस कारवाई केली नाही.
नदीपात्रातील वाळूला औरंगाबाद, पैठणसह नगर जिल्ह्यात सोन्याचा भाव मिळत असल्याने वाळू घाटाचे लिलाव झालेले नसतानाही रात्रीच्या सुमारास सर्रास ट्रॅक्टरसह अन्य वाहनांद्वारे वाळू उपसा केला जातो. उपविभागीय पोलिस अधिकारी बच्चन सिंह यंाच्या विशेष पथकाने शुक्रवारी दोन्ही ठिकाणांहून १४ वाळूचे ट्रॅक्टर पकडले असून रशीद पठाण, अनिल जगदाळे, दत्ता घायाळ, कृष्णा बोबडे, दादा तावरे, गणेश शिंदे, नागेश गोडे, गुड्डु चव्हाण, मनोर शेख, राजेंद्र पोटफोडे, विनोद काळे, नंदू गरड, अशोक गर्जे, सुनील वीर, संतोष गोरे, बाबूराव राख, रोहित औटे, मुन्ना निवारे, चंद्रकांत गोलाटे, प्रशांत जगदाळे, श्रीधर नीळ, बाबासाहेब वीर, अक्षय गोरुटे, संतोष बहुगळे आदी चालक-मालकांवर कलम ३७९, १०९, १८८ भादंवि तसेच (१ ) ते (५) गौण खनिज कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आला. ३० लाख ८० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पथकातील पोलिस उपनिरीक्षक बी. जी. गुल्लत, एफ. डी. पठाण, आर. जे. पंडित, एस. बी. भालेराव आदींनी कारवाई केली.
वाळू विरोधी पथकावर प्रश्न
तहसीलदारांनी वाळू विरोधी पथकाची स्थापना केली असली तरी या पथकाने ठोस अशी वाळूमाफियांवर कारवाई केलेली नाही. मात्र, नागरिकांतून आवाज उठवला जात असल्याने विशेष पथकाने ही कारवाई केली.
यापुढेही कारवाई सुरूच
अवैध वाळू उपसा होत असेल, तर त्यावर कारवाई करू. आम्हाला गोपनीय माहिती मिळाल्यावरून शुक्रवारी ही कारवाई करण्यात आली. यापुढेही वाळूमाफियांवर कारवाई करण्यात येईल.
- बच्चन सिंह, उपविभागीय पोलिस अधिकारी.