आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

१६ बाळंतीण ताटकळल्या, इंधनाअभावी चार रुग्णवाहिका बंद

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड - इंधनाअभावी जननी-शिशू योजनेतील चार रुग्णवाहिका बंद असल्याने बुधवारी जिल्हा रुग्णालयात प्रसूती झालेल्या १६ महिला घरी जाण्यासाठी दिवसभर ताटकळल्या. रुग्णवाहिका मिळत नसल्याचे पाहून अखेर दुपारी चार वाजता मिळेल त्या वाहनाने प्रसूती झालेल्या मातांना नातेवाईक घरी घेऊन गेले. आरोग्य विभागाच्या कारभारामुळे महिलांची हेळसांड झाली.

गर्भवती मातांना चांगली सेवा मिळावी, प्रसूती सुरक्षित व्हावी, प्रसूतीनंतरही चांगली सेवा मिळावी यासाठी आराेग्य विभागाने जननी-शिशू सुरक्षा योजना सुरू केली. यातून १०२ क्रमांकावर फोन करताच गर्भवती मातेला रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी आरोग्य विभागाकडून रुग्णवाहिका पाठवण्यात येते. प्रसूती झाल्यानंतर घरी सोडण्यासाठीही या रुग्णवाहिकेचा उपयोग करण्यात येतो. ही सेवा मोफत असल्याने ग्रामीण भागातून या रुग्णवाहिकेचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. मात्र, बुधवारी या रुग्णवाहिकांना इंधनच उपलब्ध होऊ शकल्याने रुग्णांनी नोंदणी करूनही त्यांना रुग्णवाहिका उपलब्ध होऊ शकली नाही. जिल्हा रुग्णालयात या योजनेसाठी चार रुग्णवाहिका आहेत, मात्र इंधन नसल्याने चारही वाहिका बंद होत्या.

१६रुग्णांची नोंदणी
बुधवारीसकाळी प्रसूती झालेल्या ३० महिलांना सुटी देण्यात आली. यातील १६ जणींनी जननी शिशू योजनेतून रुग्णवाहिका उपलब्ध होण्यासाठी नोंदणी केली. मात्र, इंधनाअभावी रुग्णवाहिका बंद असल्याचे सांगण्यात आले. यानंतर अनेकांनी रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याची माहिती मिळाल्याने नोंदणी करण्याचे टाळून मिळेल त्या वाहनाने घर गाठले.

फक्त नोंद करू शकतो
इंधनच नसल्याने रुग्णवाहिका देणे अवघड आहे. रुग्णांना किरायाचे पैसे देता येणे शक्य नाही. पर्यायी व्यवस्था करावी लागेल.'' प्रकाश गायकवाड, समन्वयक, जजनी शिशू रुग्णवाहिका
इंधन बिलांचा प्रश्न
इंधनाअभावी रुग्णवाहिका बंद असल्याची माहिती मला मिळाली आहे. इंधनाच्या बिलाचा प्रश्न आहे. यामुळे असे घडले. याबाबत माहिती घेऊन प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करू.'' संजय पाटील, प्रभारी अतिरिक्त सीएस

सकाळपासून प्रतीक्षेत
माझ्या पत्नीची काल प्रसूती झाली. आज सुटी मिळाल्याने रुग्णवाहिकेसाठी सकाळी वाजता नोंदणी केली, मात्र दिवसभर थांबूनही रुग्णवाहिका मिळाली नाही. '' महेश गोकुळे, पालसिंगण

आर्थिक फटका
नोंदणी केलेले रुग्ण रुग्णवाहिका मिळेल या आशेवर दिवसभर रुग्णालयाच्या परिसरात ताटकळले होते. प्रसूत झालेल्या महिलेला सुरक्षित प्रवासाची गरज असते. मात्र, बुधवारी या रुग्णवाहिका बंद असल्याने अनेकांना किरायाने इतर वाहने करून रुग्णांना घरी घेऊन जावे लागले. यात आर्थिक भुर्दंड झाला, तर अनेकांकडे पैसे नसल्याने त्यांची हेळसांड झाली.
बातम्या आणखी आहेत...