आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

160 विद्यार्थ्यांना भोजनातून विषबाधा; सहा जणांची प्रकृती चिंताजनक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उमरखेड - मुरली (ता. उमरखेड) येथील 160 विद्यार्थ्यांना मंगळवारी मध्यान्ह भोजनातून विषबाधा झाली. त्यांना लगेच ढाणकी येथील आरोग्य केंद्रात दाखल केले. यापैकी सहा विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना उमरखेडला हलविण्यात आले आहे.

शाळेच्या मध्यान्ह भोजनात मंगळवारी मटकी बनवली होती. ती खाल्ल्यावर 160 विद्यार्थ्यांना उलट्या, मळमळ, डोकेदुखी सुरू झाली. याची माहिती मिळताच पालकांनी थेट शाळा गाठून विद्यार्थ्यांवर गावातच प्राथमिक उपचार केले. नंतर 50 विद्यार्थ्यांना ढाणकी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. यातील सहा विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना उमरखेड येथील ग्रामीण रुग्णालयात हलवले. विशेष म्हणजे मंगळवारासूनच वैद्यकीय अधिकार्‍यांचा संप सुरू झाला होता. मात्र प्रसंगावान राखून त्यांनी ताबडतोब उपचार सुरू केले.

मटकीत पाल पडल्याचा आरोप
मध्यान्ह भोजनात विद्यार्थ्यांसाठी तयार केलेल्या मटकीमध्ये पाल पडल्याचा आरोप मुरलीच्या ग्रामस्थांनी केला आहे. शालेय पोषण आहारासाठी मागील वर्षीचे कडधान्य वापरल्याचा आणि पोषण आहार शिजवण्याची जागेची सफाई केली जात नसल्याचा आरोपही ग्रामस्थांनी केला आहे.