आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महामार्गासाठी 17 इमारतींवर बुलडोझर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उस्मानाबाद - शहराजवळून जाणाऱ्या धुळे-सोलापूर या राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणादरम्यान संपादीत स्थावर मालमत्ता रीकामी करण्याबाबत नोटीस देऊनही दखल घेतली जात नसल्याने अखेर महसूल प्रशासनाच्या वतीने सदरील मालमत्तांवर बुलडोझर चालवून रस्त्यासाठी जागा मोकळी करण्यात आली. ही कारवाई बुधवारी (दि.७) नायब तहसीलदार राजेश जाधव यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षभरापासून उस्मानाबाद शहराजवळून गेलेल्या धुळे-सोलापूर या राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. या अनुषंगाने जमीन संपादीत करताना प्रशासनाच्या भुसंपादन विभागाने संबधीत जागा, मालमत्ताधारकांना नोटीस देऊन संपादीत जमिनीचा मावेजा देऊन जागा रिकाक्या करण्याबाबत सांगितले होते. परंतु, अनेकांनी याला विरोध केला.
अखेर याप्रकरणी भुसंपादनाची अंतिम नोटीस देऊन सदरील जागा रीकाम्या केल्यास प्रशासन स्वत: रीकामे करेल यामध्ये नुकसान झाल्यास त्याला प्रशासन जबाबदार राहणार नाही असेही बजावले होते. परंतु, तरीही शहरातील तुळजापूर मार्गावर तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयासमोर अनेक जणांनी जागा रीकाम्या करण्यास विरोध केला होता.
अखेर वरीष्ठांच्या आदेशानुसार नायब तहसीलदार राजेश जाधव यांनी पोलिस बंदोबस्त तसेच कर्मचारी सोबत घेऊन बुधवारी सदरील कारवाई करण्यात आली. यावेळी पथकाने महामार्गाच्या रुंदीकरणात संपादीत १७ मालमत्तांवर बुलडोझर चालविला. यामध्ये बहुतांश हाॅटेल, राहते घरे, पत्र्याचे शेड आदींचा समावेश होता.
बातम्या आणखी आहेत...