आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 17 Thousand Rupees Withdrawaled From ATM Ambejogai

फसवणूक करून एटीएममधून अंबाजोगाईत 17 हजार काढले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड - एटीएमवर पैसे काढण्यासाठी गेलेल्या विवाहितेकडील एटीएमची अदला बदल करत तिच्या खात्यावरील 17 हजार रुपये लांबवल्याचा प्रकार अंबाजोगाई शहरातील महाराष्‍ट्र बँक शाखेच्या एटीएमवर 14 नोव्हेंबर रोजी घडला.
नाशिक-पुणे रोडवरील चेडेमळा येथील विवाहिता ज्ञानेश्वरी तुकाराम बडे ही 13 नोव्हेंबरला भाऊ ज्ञानोबा राख यांना भेटण्यासाठी अंबाजोगाईत आली होती. दुस-या दिवशी तीन हजार रुपये काढण्यासाठी महाराष्‍ट्र बँक शाखेच्या एटीएमवर सायंकाळी 4.15 च्या सुमारास गेली.
एटीएमवर कार्ड स्वॅप करून तिने तीन हजार रुपयांची रक्कम काढण्यासाठी कमांड दिली. बराच वेळ झाला तरी पैसे आलेच नसल्याने मागे असलेल्या तरुणाने मदत म्हणून कोड विचारत तीन हजार रुपये काढून देत स्वत:कडील दुसरे त्याच बँकेचे एटीएम त्यांना दिले. पैसे मिळाल्यानंतर ज्ञानेश्वरी घरी गेल्यानंतर त्यांच्या मोबाइलवर दोन मॅसेज आले. पहिल्यांदा दहा हजार व दुस-या वेळी सात हजार असे सतरा हजार रुपये खात्यावरून काढण्यात आल्याचा मॅसेज त्यांनी पाहिला. त्यानंतर स्वत:कडील एटीएम पाहिले असता ते दुसरेच असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
अंबाजोगाई शहर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एटीएममधील सीसीटीव्ही फुटेज मागवण्यात येणार असून त्या आधारे आरोपीचा शोध लावण्यात येईल, अशी माहिती तपास करणारे
पोलिस उपनिरीक्षक सतीश बनसोडे यांनी दिली.