लातूर - जिल्ह्यातील चाकूर तालुक्यातील धनगरवाडी येथे घृणास्पद प्रकार समोर आला आहे. करनी-भानामतीच्या संशयाने एका 17 वर्षीय मुलीसह एका महिलेला मारहाण करुन शेण खाऊ घालण्याची घटना समोर आली आहे. या प्रकराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर ही घटना उघड झाली असून या प्रकरणी जादूटोणा कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काय आहे प्रकरण
- चाकूर तालुक्यातील धनगरवाडी येथे 5 जून रोजी हा प्रकार घडला आहे.
- धनगरवाडी येथील प्रभाकर केसाले आणि इतर चार जणांनी (ज्यात एका महिलेचा समावेश आहे) गावातील दोन महिलांना तुम्हाला करनी आणि भानामती झाली आहे असे सांगून एका ठिकाणी नेले.
- येथे 17 वर्षीय मुलीसह महिलेचे हातपाय धरून मारहाण करण्यात आली. त्यांना शेण खाण्यास देण्यात आले. हे सर्व नाट्य मोबाइल मध्ये कैद झाले आहे.
...यासाठी केला व्हिडिओ व्हायरल
- या दोन महिला गावातील एका व्यक्तीच्या आधारे करनी आणि भानमती करतात असे भासविन्यासाठी चाकूर तालुक्यात हा व्हिडिओ व्हायरल वायरल करण्यात आला होता.
- व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आपली बदनामी सुरु असल्याचे लक्षात आल्यावर सोपान मूंडकर यांनी चाकूर पोलिसात तक्रार दाखल केली.
काय झाली कारवाई
- चाकूर पोलिसांनी सोमवारी (12 जून) रात्री जादूटोना विरोधी कायद्यांतर्गत एका महिलेसह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यासोबतच सोशल मीडियात बदनामी केल्याचा गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.