आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जालना औद्योगिक वसाहतीला 18 कोटींचा निधी, खोतकर यांनी मंजूर करून घेतला प्रस्ताव

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जालना- जालना औद्योगिक वसाहतीच्या रस्ते, पाइपलाइन, नवीन पाणीपुरवठा टाकीचे बांधकाम अन्य मूलभूत सुविधांसाठी १८ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यासंदर्भात राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन तातडीने प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार खोतकर यांनी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची भेट घेऊन हा प्रस्ताव मंजूर करून घेतला आहे. 

जालना औद्योगिक वसाहतीमधील समस्या लक्षात घेत खोतकर यांनी या विभागातील अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. या बैठकीत उद्योगांसाठी सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने तसेच येथील समस्या मार्गी लावण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना त्यांनी या विभागाच्या अधिकाऱ्यांना केल्या होत्या. हा प्रस्ताव दाखल झाल्यानंतर उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची भेट घेऊन या प्रस्तावास मान्यता मिळवून घेतली आहे. त्यानुसार विकासकामांसाठी हा निधी मिळणार आहे. यात जालना एमआयडीसीतील अतिरिक्त औद्योगिक वसाहत टप्पा १, टप्पा याशिवाय बीटी पार्क , जुना जालना भागातील एमआयडीसी येथील विकासकामांसाठी हा निधी वापरला जाणार आहे. यासाठी खोतकर यांनी देसाई यांचे आभार व्यक्त केले आहे, तर या सर्व कामांचे अंदाजपत्रक त्वरित तयार करून निविदा प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश खोतकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. 

एमआयडीसीत ही कामे होणार 
अतिरिक्तऔद्योगिक वसाहत टप्पा मध्ये रस्ते बांधकामासाठी कोटी ४६ लाख रुपये, टप्पा मध्ये बीटी पार्क उर्वरित रस्ता बांधकामासाठी कोटी ३६ लाख, जुन्या औद्योगिक वसाहतीत रस्ते विकासासाठी कोटी २९ लाख, अतिरिक्त जालना औद्योगिक वसाहतीमध्ये पाणीपुरवठा पाइपलाइनसाठी कोटी लाख रुपये, जुन्या औद्योगिक वसाहतीमध्ये नवीन पाणीपुरवठा टाकी बांधकामासाठी ७१ लाख ७४ हजार रुपये मंजूर करण्यात आले आहेत. 
बातम्या आणखी आहेत...