आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परभणीत 18 औषधी दुकानांचे परवाने कायमचे रद्द

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परभणी- अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने मागील सहा महिन्यांच्या कालावधीत परभणी व हिंगोली जिल्ह्यातील औषधी दुकानांच्या तपासणीत दोषी आढळलेल्या १८ दुकानांचे औषधी विक्री परवाने कायमचे रद्द करण्यात आले आहेत, तर १९ दुकानांचे औषधी विक्री परवाने ठरावीक कालावधीसाठी निलंबित करण्यात आले आहेत.

एक एप्रिल ते ३० सप्टेंबर २०१५ या कालावधीत अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने औषधी दुकानांची तपासणी मोहीम राबवण्यात आली. त्यात परभणी येथील साबळे मेडिकल अँड जनरल स्टोअर्स या दुकानाच्या तपासणीच्या वेळी त्यांचा औषध विक्री परवाना प्रशासनाने दोषाबाबत एक वर्षापूर्वीच रद्द केलेला होता. तरीसुद्धा त्यांनी विनापरवाना औषधीची साठवणूक आणि गुंगीकारक घटक असलेल्या व नशेसाठी गैरवापर होणाऱ्या औषधांची मोठ्या प्रमाणावर खरेदी आणि विक्री केल्याचे
आढळून आले.
या दुकानातील एकूण १३ हजार ७४७ रुपयांचा विनापरवाना औषधी साठा जप्त करून त्यांच्याविरुद्ध मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांकडे खटला दाखल करण्यात आला आहे. त्याचबरोबर या दुकानाचा औषधी विक्रीचा परवाना रद्द झालेला असतानासुद्धा कोणतीही शहानिशा न करता त्यांना औषध पुरवठा केलेल्या एकूण ३ ठोक औषधी विक्रेत्यांचेही परवाने रद्द करण्यात आले आहेत. चार ठोक विक्रेत्यांचे परवाने दोन महिन्यांच्या कालावधीसाठी निलंबित करण्यात आलेले आहेत. गुंगीकारक घटक असलेल्या औषधांची मोठ्या प्रमाणावर नशेसाठी विक्री केल्याने खंडोबा बाजार येथील हबीब मेडिकल अँड जनरल स्टोअर्सविरुद्ध नानलपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती सहायक आयुक्त (औषधी) वि.तु. पौनीकर यांनी दिली.
बातम्या आणखी आहेत...