आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 19 Year Old Girl Rape Case In Nanded, Three Person Arrested

लग्नाचे आमिष दाखवून युवतीवर अत्याचार, तिघांना अटक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नांदेड- लग्नाचे आमिष दाखवून १९ वर्षीय तरुणीवर दोन वर्षे शारीरिक संबंध प्रस्थापित करून मानसिक त्रास दिल्याच्या आरोपावरून ८ जणांविरुद्ध रविवारी रात्री मुक्रमाबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

देगलूर तालुक्यातील नरसिंग बळवंतराव झाडे (२०) याचे गावातील तरुणीशी २०१२ पासून प्रेमसंंबंध होते. या दोघांनी लग्न करण्याचेही ठरवले, परंतु कालांतराने नरसिंगने लग्नास टाळाटाळ केली. मुलीने तगादा लावल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांनी तिचे लग्न न लावताच घरात आणून ठेवले. दोन महिन्यांनंतर मात्र तुझ्या माहेरहून १५ लाख रुपये व मोटारसायकल घेऊन ये, तुझ्या वडिलांची अर्धी मालमत्ता नावावर करून दे, यासाठी मुलीचा छळ सुरू झाला. मुलीने लग्नाचा तगादा लावल्यानंतर तिला धमक्या देण्यात आल्या. हा छळ असह्य झाल्याने मुलीने अखेर रात्री पोलिस ठाणे गाठून तक्रार नोंदवली. या तक्रारीवरून नरसिंग बळवंतराव झाडे, योगेश विठ्ठल कौरवाड, माधव बाबूराव झाडे, बळवंतराव झाडे व इतर ४ जणांविरुद्ध अत्याचाराचा गुन्हा नोंदवण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी नरसिंग बळवंत झाडे, बळवंत नरसिंग झाडे, माधव बळवंत झाडे या तिघांना अटक केली. इतर आरोपींचा शोध सुरू आहे.