आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मानापमानातून हाणामारीत दोघांचा खून, हिंगोलीतील घटना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिंगोली - कालीमाता मंदिर भागातील मोची गल्ली येथे गुरुवारी रात्री १०.४५ च्या सुमारास मोची समाजातील दोन गटांत मालमत्ता आणि सार्वजनिक कार्यक्रमाच्या मानापमानातून निर्माण झालेल्या खुन्नसमधून तुंबळ हाणामारी झाली. या हाणामारीत दोन युवकांचा मृत्यू झाला असून चौघेजण नांदेड येथील रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहेत. जितू प्यारेलाल कुरील (२७) व महावीर गजू कुरील (२५) अशी मृतांची नावे आहेत. या दोघांचा नांदेड येथे उपचारापूर्वीच रुग्णालयात मृत्यू झाला.  
 
खासगी मालमत्ता आणि समाजाच्या सार्वजनिक कार्यक्रमात मानापमान झाल्याच्या कारणावरून गेल्या दोन वर्षांपासून दोन गटांत धुसफूस चालू होती. यापूर्वी या दोन्ही गटांत लहानमोठे वाद होऊन क्षुल्लक हाणामारीही झाली आहे. परंतु प्रकरण पोलिसांत गेले नव्हते.
बातम्या आणखी आहेत...