आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्नीबरोबर संबंध असल्याच्या संशयावरून रिक्षा चालकाला जात पंचायतीचा 2 लाखांचा दंड

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - Divya Marathi
फाइल फोटो
उस्मानाबाद- पत्नीबरोबर संबंध असल्याच्या संशयावरून जात पंचायत बसवून रिक्षा चालकाला दोन लाख रुपयांचा दंड ठोठावणाऱ्या व दंड न दिल्यास जातीतून वाळीत टाकण्याचा निर्णय घेणाऱ्या जात पंचायतच्या पाच सदस्यांविरोधात उस्मानाबाद शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. हा प्रकार जुलै महिन्याच्या ५ तारखेला घडला असून सततच्या त्रासाला कंटाळून रिक्षाचालक तरुणाने पोलिस ठाण्यात धाव घेतली.  

उस्मानाबाद शहरातील साठेनगर येथील रहिवासी रजनीकांत अशोक पवार (२५) हा पारधी समाजाचा विवाहित तरुण रिक्षा चालवून उपजीविका भगवतो. दरम्यान यातील आरोपी सुनील चव्हाण हा एका गुन्ह्यामध्ये उस्मानाबाद कारागृहात असल्याने त्याची पत्नी उस्मानाबादेत राहते. चार महिन्यांपूर्वी सुनीलची पत्नी रजनीकांतच्या रिक्षात बसून कारागृहात पतीला भेटण्यासाठी गेली होती. तेव्हा रिक्षाचे भाडे नंतर देते असे म्हणून मोबाइल क्रमांक घेऊन गेली. त्यानंतर पैसे देण्यासाठी तिने रजनीकांतला फोन केला. या कारणावरून सुनीलने जेलमधून बाहेर आल्यानंतर पत्नीवर संशय घेऊन जात पंचायत बसवली. या वेळी पंचायतचे सदस्य झिंग्या पवार, राजेंद्र काळे, ज्ञानेश्वर काळे व सुनील चव्हाण अादी उपस्थित होते. यात सदस्यांनी रजनीकांतला दोषी धरून त्याला दोन लाख रुपयांचा दंड लावला. दंड न भरल्यास तुला जातीतून वाळीत टाकण्यात येईल,असे सांगितले.

नवीन कायद्यानुसार पहिलाच गुन्हा  
जिल्ह्यात विविध ठिकाणी यापूर्वी जात पंचायतीचे प्रकार घडले असून गुन्हेही दाखल आहेत. दरम्यान, राज्य शासनाने ३ जुलै २०१७ रोजी अशा घटनांना पायबंद घालण्यासाठी नवीन कायदा अंमलात आणला. त्यानुसार उस्मानाबाद जिल्ह्यात दाखल होणारा हा पहिला गुन्हा आहे.
बातम्या आणखी आहेत...