आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 2056 Tankers Provide Water In Marathwada Revenue Minister Khadse

खडसेंच्या हेलिकॉप्टर उतरवण्‍यासाठी हेलिपॅडवर 10 हजार लिटर पाण्‍याची नासाडी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर - निम्न तेरणातील पाणी लातूरला आणण्यासाठी महसूलमंत्री एकनाथ खडसे औसा तालुक्यातील बेलकुंडला आले होते. त्यांचे हेलिकॉप्टर उतरवण्यासाठी हेलिपॅडवर दहा हजार लिटर पाणी मारण्यात आले. खडसेंनी मात्र कानावर हात ठेवले.
दरम्यान मराठवाड्यात दिवसागणिक पाण्याची आणि चाऱ्याची टंचाई वाढत चालल्याचे सांगतानाच मराठवाड्यात आजघडीला २०५६ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असल्याची माहिती महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी दिली. लातूरला निम्न तेरणा धरणातून पाणी देण्याच्या योजनेचा प्रारंभ शुक्रवारी त्यांच्या हस्ते झाला. त्यांनी लातूरच्या रेल्वेस्थानकाला भेट देऊन रेल्वे टँकरने दिल्या जात असलेल्या पाणीव्यवस्थेची पाहणी केली.

खडसे यांनी लातूरच्या विश्रामगृहावर विभागीय आयुक्त उमाकांत दांगट यांच्या उपस्थितीत लातूर, बीड, उस्मानाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मराठवाड्यात ३५६ छावण्या सुरू असून त्यामध्ये ३ लाख ७२ हजार ८८१ जनावरांना चारा पुरवला जात आहे. आणखी १७ छावण्यांना मंजुरी दिली असून त्या कार्यान्वित होत आहेत.पालघरमधून चारा मागवण्याविषयी जिल्हाधिकाऱ्यांना अधिकार दिले आहेत. त्यानंतर चारा डेपो सुरू करण्याविषयीचे पाऊल टाकण्यात येईल, असे ते म्हणाले.

पुढे वाचा... प्रशासनाची पाठ थोपटली, पंतप्रधान होते लक्ष ठेवून