आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परभणीचा तरुण ISIS च्‍या संपर्कात, महाराष्‍ट्र ATS ने घेतले ताब्‍यात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परभणी - सोशल मीडियाच्‍या माध्‍यमातून सीरियातील ISIS शी निगडित असलेल्‍या फारुख या दहशतवाद्याच्‍या संपर्कात असलेल्‍या आलेल्‍या येथील एका तरुणाला आज (गुरुवारी) महाराष्‍ट्र दहशतवादी विरोधी पथकाने (एटीएस) ताब्‍यात घेतले. नसीरबिन याफी चाऊस (21) असे त्‍याचे नाव आहे.

भारतात घडवून आणणार होता घातपात ?
> इसिसमध्ये सहभागी होण्यासाठी नसीरबिन हा सीरियाकडे जाण्याच्या तयारीत होता.
> एवढेच नाही तर तो भारतात अतिरेकी कारवाई करण्याच्या तयारीत असल्‍याचा संशय पोलिसांना आहे.
> त्‍या आधारे त्‍याला ताब्‍यात घेण्‍यात आले आहे.
समुपदेशन करणार
> नसीरबिन अवघ्‍या 21 वर्षांचा आहे.
> त्‍याच्‍या शिवाय महाराष्‍ट्रातील कोण - कोण युवक इसिसच्‍या संपर्कात आहेत. त्‍यांना इसिस बद्दल का आकर्षण वाटते, याची त्‍याच्‍याकडून माहिती मिळवण्‍याचा प्रयत्‍न एटीएस करत आहे.
> या शिवाय त्‍याचे समुपदेशनही केले जाणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
बातम्या आणखी आहेत...