आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दामदुप्पटचे आमिष दाखवून 22 लाखाला गंडा; पुण्यातील आरंभ कंपनीच्या 11 जणांवर गुन्हा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तुळजापूर- गुंतवणुकीवर आकर्षक दर देण्याचे आमिष दाखवून एकाला लाखो रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी आरंभ अॅग्री अँड कॅटल प्रा. लि. कंपनीच्या चेअरमन, संचालकासह ११ जणांविरुद्ध  गुन्हा दाखल झाला. तब्बल २२ लाख, ६ हजार ६१४ रुपयांची फसवणूक केल्याची घटना २० नोव्हेंबर २००८ ते ८ ते १ डिसेंबर २०१५ च्या २ वाजेपर्यंत रंगराज लॉज तुळजापूर, अष्टभुजा खानावळ नळदुर्ग रोड, मुथुट फायनान्स जवळ तुळजापूर येथे घडल्याचे तक्रारीत म्हटले आहे.   


आरंभ अॅग्री अँड कॅटल प्रायव्हेट कंपनीने तुळजापुरातील कुबेर गणपती जाधव (५४, रा. नवोदय विद्यालय समोर नळदुर्ग रोड, हेलिपॅड जवळ) ‘तुम्हाला पैसे भरल्याचा जास्तीत जास्त परतावा देईल व पाच ते सहा वर्षांत एफडी केलेले पैसे दामदुप्पट देईल’ असे आमिष दाखवून फसवणूक केली.  आरंभ कंपनीचे चेअरमन संजय कमलाकर धनवे (रा. प्रतिभा व्हिला प्लांट नं ३ वारजे भालेवाडी पुणे,) डायरेक्टर सौ. दीपा धनंजय धनवे (रा. घर क्र ९०४ सातवा मजला डी ब्लॉक वारजे पुणे), धनंजय कमलाकर धनवे (रा. वारजे पुणे), प्रशांत मोरे, सतीश मोरे (रा. पुणे), भगीरथ आलझेंडे (रा. काळेवाडी पुणे), चंद्रकांत फाडके (रा. सातारा), सुभाष खैरे, कैलास खेडेकर (रा. उरळी कांचन पुणे), व  सूरज मोरे आणि विष्णू रामचंद्र माने (दोघे रा. एस टी कॉलनी तुळजापूर) यांनी आरंभ अॅग्री अंॅड कॅटल प्रा.लि. कंपनीची तुळजापूरमध्ये शाखा चालू करून कंपनीची माहिती ग्राहकांना कंपनीच्या शेळ्या, मेंढ्या,गाई, म्हशीचा, आरंभ चहाचा, ससे पालनांचा, फुल शेतीचा , प्लॉट खरेदी विक्रीचा मोठा व्यवसाय आहे. तुम्हाला कंपनी पैसे भरण्याचा जास्तीत जास्त परतावा देते व पाच ते सहा वर्षांत एफडी केलेल्या पैशाची दाम दुप्पट देते, असे अामिष दाखवून ग्राहकांकडून पैसे घेऊन प्रत्यक्षात ग्राहकांनी कंपनीकडे १६ लाख, ११ हजार ७३० रुपये तसेच चेकद्वारे ३ लाख, १६ हजार ८८४ रुपये व एफडीची रक्कम २ लाख ७८ हजार असे एकूण २२ लाख, ६ हजार ६१४ रुपये जमा केले होते.

बातम्या आणखी आहेत...