आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • 2270 Crores Provision For The 105 Water Project In State : CM Chavan

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राज्यातील 105 जल योजनांसाठी 2270 कोटींची तरतूद : मुख्यमंत्री चव्हाण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उस्मानाबाद - उस्मानाबाद, जालना, यासारख्या भागांना पाणीपुरवठा योजनेच्या कामांसाठी विशेष बाब म्हणून तातडीने निधी देण्यात आला आहे. राज्यातील 105 योजनांसाठी 2270 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून, चार महिन्यांत या योजना पूर्ण करण्यात येतील. सरकारने आतापर्यंतच्या दुष्काळात या वेळी सर्वाधिक निधी खर्च केला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली. तुळजापूरमध्ये छत्रपती संभाजी महाराज पुतळा अनावरणप्रसंगी ते बोलत होते. राष्‍ट्रसंत भय्यू महाराज यांच्या पुढाकारातून पालिकेच्या उद्यानामध्ये संभाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आला आहे.


25 टीएमसी पाण्याबाबत नाराजी
मराठवाड्याच्या हक्काच्या 25 टीएमसी पाण्याबाबत सत्ताधारी पक्षाचे खासदार डॉ. पद्मसिंह पाटील यांच्यासह भाजपचे खासदार गोपीनाथ मुंडे यांनी प्रथमच एकमत दाखवले. ‘आम्हाला आता लाज वाटू लागली आहे’, अशा शब्दात डॉ. पाटील यांनी थेट सरकारवर नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, 25 टीएमसी पाण्याच्या मंजुरीसाठी मला ठिय्या आंदोलन करावे लागले होते.