आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

२४ हजार नागरिकांनी उघडले ‘ई-लॉकर’, महत्त्वाची कागदपत्रे सुरक्षित

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जालना - महत्त्वाची कागदपत्रे कायमस्वरूपी जतन करण्यासाठी शासनाने आधार कार्डच्या नंबरशी संबंधित ‘ई-लॉकर’ची सुविधा सुरू केली आहे. महाराष्ट्रातून आतापर्यंत २४ हजार २२९ नागरिकांनी या लॉकरमध्ये महत्त्वाची कागदपत्रे अपलोड केली आहेत.
महत्त्वाची कागदपत्रे गहाळ होणे, पावसाने भिजल्यामुळे खराब होणे, चोरीस जाणे यामुळे मूळ कागदपत्रांच्या प्रती आपल्याकडे राहत नाहीत. त्यासाठी elocker.maharashtra.gov.in या वेबसाइटद्वारे तुम्ही ‘ई-लॉकर’ला लॉग इन करू शकता. लॉग इन करण्यासाठी तुमचा आधार नंबर गरजेचा आहे. यामध्ये लॉग इन केल्यानंतर महत्त्वाची कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करू शकता आणि जेव्हा गरज पडेल त्या वेळी त्यांचा उपयोग करू शकता. कागदपत्रांच्या सुरक्षिततेसाठी वन टाइम पासवर्डची सुविधा देण्यात आली आहे. ज्या वेळी आधार क्रमांकाच्या साहाय्याने युजर लॉकर उघडण्यासाठी लॉग इन करेल त्या वेळी मोबाइलद्वारे नवीन पासवर्ड युजरला पाठवला जाईल. महा ई-सेवा केंद्रावर फक्त दोन रुपयांत अकाउंट ओपन करता येते. त्यामुळे कागदपत्रांचा गैरवापर होणार नाही आणि सुरक्षितता कायम राहील.

असे उघडा खाते
elocker.maharashtra.govt.in या संकेतस्थळावर आपला १२ अंकी आधार क्रमांक टाकून `साइन अप’ करा. त्यानंतर तुम्ही आधार कार्डवेळी जो मोबाइल नंबर रजिस्टर केला आहे, त्या नंबरवर एक `वन टाइम पासवर्ड’ (ओटीपी) येईल. तो पासवर्ड अर्ध्या तासापर्यंत वापरता येईल, अन्यथा परत लॉग इन करावे लागेल. हा पासवर्ड टाकून ‘व्हॅलिडेट ओटीपी’वर क्लिक करा. या प्रक्रियेनंतर तुम्हाला ६ अंकी पिन तयार करावा लागतो. हा पिन कायमस्वरूपी असतो.

तुम्ही तयार केलेला पिन टाकून ‘व्हॅलिडेट पिन’वर क्लिक करा. तुमचा ‘महा डिजिटल लॉकर’ तयार होईल. नंतर तुमच्या ‘महाडिजिटल लॉकर’वर तुम्ही महत्त्वाची ‘कागदपत्रे अपलोड करू शकता. त्यासाठी अपलोड डॉक्युमेंट्स’वर क्लिक करा. डॉक्युमेंट्स केवळ पीडीएफ, जेपीईजी, पीएनजी, बीएमपी किंवा जीआयएफ या फॉरमॅटमधीलच असणे आवश्यक आहे.
विभागनिहाय केली कागदपत्रे अपलोड
औरंगाबाद २०००
अमरावती ३१००
कोकण ४०५०
नागपूर ५०५०
नाशिक ५०२०
पुणे ५००९
बातम्या आणखी आहेत...