आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोलंग्रीत पेयजल योजनेच्या कामात २६ लाखांचा अपहार, लाेकप्रतिनिधींची खाबुगिरी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड- राष्ट्रीय पेयजल कार्यक्रमांतर्गत मंजूर झालेल्या शासकीय पाणीपुरवठा योजनेची पाइपलाइन पाण्याची टाकी बांधता बँक खात्यात वर्ग झालेले २५ लाख ४६ हजार रुपये परस्पर काढून अपहार केल्याप्रकरणी नेकनूर पोलिस ठाण्यात अध्यक्षासह सचिव महिलेच्या पतीवर गुन्हा दाखल झाला आहे.
बीड तालुक्यातील गाेलंग्री येथे पाण्याची टाकी बांधून गावात पाइपलाइन करण्यासाठी राज्य, केंद्र सरकारकडून राष्ट्रीय पेयजल कार्यक्रमांतर्गत निधी मंजूर करण्यात आला होता. मंजूर करण्यात आलेला २५ लाख ४६ हजार रुपयांचा निधी पाणीपुरवठा समितीचे अध्यक्ष जयसिंग मच्छिंद्र कवडे पांडुरंग कवडे या दोघांच्या बँक खात्यात जमा करण्यात आला होता; परंतु दोघांनी गावात पाणीपुरवठा योजनेचे कामच केले नसल्याने गावावर पाणीटंचाईचे संकट ओढवले. गोलंग्री येथे १७ जून २००८ ते १८ जानेवारी २०१६ या काळात हा प्रकार घडला आहे. शेवटी हा प्रकार लक्षात आल्यांनतर जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा योजनेचे उपअभियंता शिवानंद आंटक यांनी नेकनूर ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून दोघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

दोन महिन्यांपासून टँकर नाही
गावात टँकरने पाणीपुरवठा केला जावा यासाठी सरपंच मनिषा कवडे यांनी बीड पंचायत समितीला दोन महिन्यांपूर्वी ठराव दिला. मात्र, गटविकास अधिकाऱ्यांनी अद्याप प्रस्तावावर स्वाक्षरी केली नाही. त्यामुळे टँकर मिळू शकले नाही.

मटका फोडो आंदोलन
गोलंग्रीयेथील पाणीपुरवठा योजनेतील दोषींवर गुन्हे दाखल करावेत यासाठी १८ जानेवारी २०१६ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर डॉ. गणेश ढवळे यांच्या नेतृत्वाखाली श्रीकांत कवडे, विनोद भोयटे, सचिन कवडे, विनोद भोयटे, विजय सुपेकर यांनी मटका फोडो आंदोलन केले होते.

लोकसंख्या वाढवली
पाणीपुरवठा योजना समितीच्या तत्कालीन अध्यक्ष सचिवांनी गावची लोकसंख्या १२०० असताना ती कागदोपत्री २२०० केली आहे. जयसिंग कवडे शहादेव कवडे यांच्याकडून योजनेची रक्कम पोलिसांनी वसूल करावी, अशी मागणी श्रीकांत कवडे यांनी केली आहे.

पाण्यासाठी फरपट
बीड तालुक्यातील गोलंग्री गावची लोकसंख्या १२०० असून आठ वर्षापासून ग्रामस्थांची पाण्यासाठी फरपट सुरू आहे. अर्धा किलो मीटर पायपिट करून बोअरवरून पाणी भरावे लागते. ग्रामपंचायतीचा गावात केवळ एकच हातपंप असून तो सुध्दा आटण्याच्या मार्गावर आहे. सध्या गावात भारत कवडे यांची विहीर विनोद भोईर यांच्या बोअरमधून ग्रामस्थ पाणी भरत आहेत.

सचिव महिलेच्या पतीवर गुन्हा
गोलंग्री येथील पाणीपुरवठा योजनेच्या समितीवर अध्यक्ष म्हणून जयसिंग कवडे, तर सचिव म्हणून मनीषा शहादेव कवडे हे काम पाहत होते; परंतु या प्रकरणात समितीवरील सचिव महिलेचे पती शहादेव पांडुरंग कवडे (रा. गोलंग्री) यांच्यावरच नेकनूर ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.