आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाकोडा सोसायटीत 3 लाखांची घरफोडी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- सर्मथ हॉटेलच्या पाठीमागील नाकोडा गृहनिर्माण सोसायटीमधील रमेश वैद यांचे घर फोडून 9 तोळे सोने व 40 हजार रुपये घरफोडी झाल्याची घटना शनिवारी उघडकीस आली. घरात कोणीही नसल्याची संधी साधत चोरट्यांनी घराचा कडी-कोयंडा उचकटून ही चोरी केली. 7 वा 8 फेब्रुवारी रोजी घरी कोणीच नव्हते. नातेवाइकांचे निधन झाल्याने सर्वजण गावी गेले होते. या कालावधीत चोरट्यांनी डाव साधत चेारी केली. शनिवारी गावाहून परत आल्यानंतर चोरी झाल्याचे दिसून आले. याप्रकरणी रमेश फकीरचंद वैद (रा. 56-19 नाकोडा गृहनिर्माण सोसायटी) यांनी फिर्याद दिली आहे.