आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंगोली जिल्ह्यातील पांगरा शिंदे गावात भूगर्भात आवाज, 3 रिश्टरचा भूकंप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिंगोली- वसमततालुक्यातील पांगरा शिंदे गावात बुधवारी दुपारी १२.०३ वाजता मोठा गूढ आवाज येत जमीन ते मिनिटे हादरली. गावापासून सुमारे १५० किलोमीटर अंतरावरील लातूरच्या भूकंपमापन केंद्रात या धक्क्याची रिश्टर मापकावर तीव्रता इतकी नोंदवली गेली. १२.०९ वाजेच्या भूकंपाची तीव्रता २.२ होती. 

हादऱ्यांमुळे घरात सामान, पत्रे आदळले. औंढा तालुक्यातील सोनवाडी शाळेच्या इमारतीला तडे गेल्याने शाळा झाडाखाली भरवण्यात आली. गेल्या तीन महिन्यांपासून पांगरा शिंदे येथे भूकंपाचे सौम्य धक्के बसत आहेत. बुधवारचे धक्के मात्र नेहमीपेक्षा मोठे होते. गावापासून सुमारे २५ किमी अंतरापर्यंत त्याचे हादरे जाणवले.