आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

परभणीत ३२ जणांना सरबतातून विषबाधेचा प्रकार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परभणी - मोहरम ताजियानिमित्त पिण्यात आलेल्या सरबतातून व कच्च्या दुधातून ३२ जणांना विषबाधेचा प्रकार झाल्याची घटना बुधवारी (दि. १२) शहरातील पारवा गेट भागात घडला. यात पाच मोठ्या व्यक्तींचा, तर अन्य सर्व मुलांचा समावेश असून त्यांच्यावर येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून सर्वांची प्रकृती सुधारत असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. पारवा गेट भागात बुधवारी मोहरमनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीपूर्वी मुलांना सरबताचे वाटप करण्यात आले होते. काही मुले कच्चे दूधही प्यायली होते. सकाळी हा प्रकार घडल्यानंतर दुपारी दोन वाजेपासून मुलांना उलट्या व शौचास लागली. पाच मोठ्या व्यक्तींनाही हा त्रास सुरू झाला. पाठोपाठ अनेक मुलांना हा त्रास होण्यास सुरुवात झाल्यानंतर त्यांना सायंकाळी पाचच्या सुमारास जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपचार केल्यानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली.
बातम्या आणखी आहेत...