आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तीन वर्षांत "प्रतिष्ठान'चे ३५ विद्यार्थी सैन्यात भरती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पैठण - राष्ट्रीय छात्र सेनेच्या माध्यमातून करिअरसोबतच देशसेवेसाठी तरुण घडवण्याचे काम येथील प्रतिष्ठान महाविद्यालयाने एनसीसीच्या माध्यमातून साध्या केले. मागील तीन वर्षांत ३५ एनसीसीचे विद्यार्थी देशसेवेसाठी सैन्यात भरती झाले आहेत, तर पाच विद्यार्थी हे पोलिस प्रशासनात महाराष्ट्रात सेवा बजावत आहेत. स्वातंत्र्य दिवसानिमित्त आढावा घेतला असता ही माहिती समोर आली.

महाविद्यालयीन जीवन हे माणसातील माणूस घडवण्याबरोबरच करिअरचा महत्त्वाचा टप्पा पार करणारे क्षेत्र असल्याने अनेक जणांची यासाठी धडपड सुरू असते. त्यातच गेल्या चार वर्षांत येथील प्रतिष्ठान महाविद्यालयात राष्ट्रीय छात्रसेनेचे आकर्षण विद्यार्थ्यांमध्ये वाढले आहे. त्यातूनच आपले करिअर होते याची जाणीव विद्यार्थ्यांना झाल्याने अनेकांचा एनसीसीकडे ओढा वाढला आहे. यात विशेषत: ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा ओढा अधिक दिसून येत आहे. गेल्या तीन वर्षांचा अाकडा पाहता या महाविद्यालयातील ३५ विद्यार्थी हे सैन्याच्या विविध बटालियनमध्ये भरती झाले आहेत.

पैठण तालुक्यातील श्रीनाथ हायस्कूल, जिल्हा परिषद प्रशाला व प्रतिष्ठान या तीन विद्यालयांत एनसीसीचे केडर होतात. त्यात दरवर्षी ५० विद्यार्थी ११ वी १२ वी व यादरम्यान एनसीसीत प्रवेश घेता येतो. यातून विद्यार्थ्यांनी दिल्ली येथे होणाऱ्या कवायतीत सहभागी होत आपली वेगळी ओळख निर्माण केली.
कॉलेज जीवनात देशसेवा
कॉलेज जीवनात देशसेवा आज एनसीसीच्या माध्यमातून होत आहे. शिवाय आता करिअरचा मार्ग मिळाल्याने या तीन वर्षांत येथील ३५ विद्यार्थी सैन्याच्या विविध बटालियनमध्ये दाखल झाले आहेत. मधुकर बेकरे, प्रमुख लेप्टनंट, प्रतिष्ठान महाविद्यालय, पैठण