आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिशेब न दिल्याने जिल्ह्यातले ३५६ ग्रामपंचायत सदस्य ठरवले अपात्र

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - सहा महिन्यापुर्वीच निवडून आलेल्या ग्रामपंचायत सदस्यांनी खर्चाचा हिशोब सादर न केल्याने जिल्हाधिकारी डॉ निधी पांडे यांनी ३५६ ग्रामपंचायत सदस्यांना अपात्र ठरवले आहे. त्याचबरोबर पराभूत झालेल्या १७४० सदस्यांना देखील पाच वर्ष निवडणुक लढवण्यास अपात्र घोषीत केले आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या या निर्णयामुळे जिल्ह्यातल्या ग्रामपंचायत सदस्यामध्ये खळबळ उडाली आहे.

जिल्ह्यातल्या ५५२ ग्रामपंचायतीच्या निवडणुका ऑगस्ट २०१५ मध्ये घेण्यात आल्या होत्या. यामध्ये निवडणुकीतल्या उमेदवारांना खर्चाचे विवरणपत्र देणे बंधनकारक होते. मात्र निवडून आल्यानंतरही आणि पराभूत झालेल्या उमेदवारांनीही खर्च प्रशासनाकडे सादर केला नाही.
राज्य निवडणुक आयोगाने विजयी झालेल्या उमेदवारांच्या खर्चाचे विवरण विजयी पराभूत उमेदवाराकडून घेण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला दिले होते. जिल्हा प्रशासनाने निवडून आलेल्या तसेच पराभूत उमेदवार अश्या २५०० जणांना नोटीसा दिल्या होत्या. त्यापैकी ४०० जणांनी केवळ खर्च सादर केला. परंतू निवडणून आलेल्या ३५६ ग्रामपंचायत सदस्यांनी खर्चाचा हिशोब दिला नाही. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने दोनदा नोटीस बजावल्यानंतरही हिशोब सादर केल्यामुळे सामान्य प्रशासनाचे उपजिल्हाधिकारी देवेंद्र कटके यांनी तुम्हाला अपात्र का ठरवू नये अशी नोटीस बजावली होती. त्यानंतरही नोटीस दिल्यानंतही उत्तर दिल्यामुळे जिल्हाधिकारी निधी पांडे यांनी सहा महिन्यापुर्वी निवडून आलेल्या जिल्ह्यातील ३५६ ग्रामपंचायत सदस्यांना अपात्र ठरवले आहे.
औरंगाबाद तालुक्यातील ६७ सदस्यांना फटका : निवडणुकीचाखर्च सादर केला नाही म्हणून औरंगाबाद तालुक्यातील ६७ ग्रामपंचायत सदस्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. त्यामुळे या सर्वांचा सदस्य औटघटकेचा खेळ ठरला आहे.

सिल्लोड तालुक्यातील २६ जणांचा समावेश
सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणुका लढवणाऱ्या उमेदवारांनी निवडणूक खर्च दाखल केला नसल्याने जिल्हाधिकारी औरंगाबाद यांनी आज निवडून आलेल्या २६ सदस्यांना अपात्र ठरवल्याने खळबळ उडाली आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीचा खर्च वेळेत दाखल करणे गरजेचे असताना निवडणूक लढवलेल्या सदस्यांनी खर्च दाखल केल्याने मंगळवारी जिल्हाधिकारी निधी पांडे यांनी निवडून आलेल्या २६ सदस्यांना, तर पराभूत ३१४ उमेदवारांना अपात्र ठरवल्याने त्यांना पुढील सहा वर्षे निवडणूक लढवता येणार नाही. जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाच्या विरोधात विभागीय आयुक्तांकडे दाद मागता येणार आहे. सदस्यत्व रद्द करण्यात आलेल्या सदस्यांची नावे ग्रामपंचायत पुढीलप्रमाणे आहे. पार्वता यशवंता शिंदे, अंबादास सांडू शिंदे (सावखेडा-धोडखेडा), काशीनाथ देवराव घुगरे, अलका सुरेश ढगे, राधाकिसन घुगरे, प्रेमराज सांडू करघे (घटांब्री), विद्या नाना पांढरे (दहेगाव), रुख्मण सखाराम दिवटे (धावडा-चिंचवन) आदीचा समावेश आहे.