आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कन्नडला चार मित्रांचा उंबरखेड तांड्याजवळील सातकुंड तलावात बुडून मृत्यू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कन्नड- तालुक्यातील उंबरखेड तांड्याजवळील आदर्श वसाहत सातकुंड येथे शुक्रवारी (दि. २८) दुपारी दोनच्या सुमारास तलावात पोहण्यासाठी गेलेल्या चार शाळकरी मुलांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला.

कृष्णा चरणदास राठोड (१७, इयत्ता अकरावी, तेलवाडी), रामेश्वर पंडित पवार (१५), उमेश कैलास पवार (१५), आकेश जयलाल पवार (१५, तिघे इयत्ता नववी, नागापूर) ही शाळकरी मुले गावाजवळील तलावात पोहण्यासाठी गेली. आकेश काठावर बसून होता. आपले तीन मित्र बुडत असल्याचे पाहून आकेशने मदतीसाठी आरडाओरड केली. मात्र कोणीही नसल्याचे बघून तो पण पाण्यात उतरला. हा प्रकार शेजारच्या शेतात काम करत असलेल्या शेतकऱ्याने पाहिला. गावकऱ्यांना मदतीसाठी बोलावले. चारही मित्रांना बाहेर काढून गावकऱ्यांनी रुग्णालयात हलवले. मात्र, तोवर चौघांचीही प्राणज्योत मालवली होती.
बातम्या आणखी आहेत...