आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ठकांकडून ४ कोटींचा गंडा, सोयाबीन निर्यात करतो म्हणून व्यापाऱ्यांना फसवले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अंबाजोगाई / लातूर - तुमचे सोयाबीन परदेशात निर्यात करून घसघशीत पैसे मिळवून देतो, अशी बतावणी करून मध्य प्रदेशच्या धार येथील व्यापाऱ्यांनी अंबाजोगाई व उदगीरच्या व्यापाऱ्यांना ३ कोटी ७८ लाख ८० हजार २६८ रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी उदगीर व अंबाजोगाई पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

मध्य प्रदेशातील धार तालुक्यातील इंदूर येथील व्यापारी राजेंद्र अग्रवाल, अनुप अग्रवाल, अंकुश अग्रवाल, आयुष अग्रवाल यांनी २८ नोव्हेंबर २०१५ रोजी अंबाजोगाई येथील आडत व्यापारी भगवान भन्साळी यांच्याकडून सोयाबीन खरेदी केली. तुमच्या सोयाबीनची निर्यात परदेशात करतो, असे सांगून ते २ कोटी १६ लाख ६१ हजार ४०७ रुपयांचे २० हजार दोनशे कट्टे सोयाबीन मध्य प्रदेशला घेऊन गेले. निर्यातीत सोयाबीनला मोठा भाव मिळेल, या आशेने भन्साळी यांनी अग्रवाल यांच्यावर विश्वास टाकला. व्यवहाराच्या वेळी अग्रवाल यांनी काही रक्कम दिली. परंतु काही दिवसांनंतर सोयाबीनची पुढील रक्कम देण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे फसवणूक झाल्याचे भन्साळी यांच्या लक्षात आले. त्यांच्या तक्रारीवरून अंबाजोगाई पोलिसात गुन्हा
दाखल झाला आहे.
दरम्यान, अग्रवाल कंपूच्या जाळ्यात अडकलेल्या भन्साळी यांच्या आग्रहावरूनच उदगीर येथील बबन हैबतपुरे यांचीही फसवणूक झाली. हैबतपुरे यांना मागच्या भन्साळींनी फोन करून मध्य प्रदेशातील अग्रवाल नावाच्या व्यापाऱ्यांना सोयाबीन खरेदी करावयाचे असून तुमचे सोयाबीन त्यांनाच विका. पार्टी विश्वासू व व्यवहारात चोख असल्याने मीही माझे सोयाबीन त्यांनाच विकले असे हैबतपुरे यांना सांगितले. त्यावर विश्वास ठेवून हैबतपुरे यांनी अग्रवाल यांना २० ते २७ नोव्हेंबर या कालावधीत २ कोटी १२ लाख १८ हजार ८६१ रुपयांचे ५ हजार ५११ पोती सोयाबीन विक्री केले. प्रारंभी आरटीजीएसने अग्रवाल यांनी हैबतपुरे यांच्या बँक खात्यावर ५० लाख रुपये जमा केले. उर्वरित एक कोटी ६२ लाख १८ हजार ८६१ रुपयांचे सोयाबीन निर्यात करावयाचे असल्याचे सांगून व त्याची रक्कम लागलीच देण्याची हमी देऊन अग्रवाल यांनी वेगवेगळ्या ट्रकमधून सोयाबीन नेले. परंतु त्यांनी नंतर हैबतपुरे यांच्याशी कसलाच संपर्क ठेवला नाही. दिलेल्या मुदतीत पैसे न आल्याने हैबतपुरे यांच्या पायाखालची वाळू सरकली. त्यांनी अग्रवाल यांना संपर्क साधला, पण त्यांचा मोबाइल बंद असायचा. शिवाय दिलेल्या पत्त्यावर ते आढळले नसून ते फरार झाल्याची माहिती हैबतपुरे यांना मिळाली व त्यांनी पोलिस ठाणे
गाठून फिर्याद दिली.
बातम्या आणखी आहेत...