आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बँकेच्‍या कर्जाला कंटाळून 4 शेतकऱ्यांची आत्महत्या, परभणी तालुक्‍यातील घटना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परभणी - पाथरी तालुक्यातील लोणी बु., सिमरगव्हाण आणि पाथरगव्हाण येथील तीन, तर परभणी तालुक्यातील झाडगाव येथील एका अशा चौघा शेतकऱ्यांनी नापिकी व बँकेच्या कर्जाला कंटाळून आत्महत्या केली.     
 
लोणी बु. येथील मारुती रासवे (५२) यांनी कर्जाला कंटाळून शुक्रवारी रात्री साडेआठच्या सुमारास घराच्या छतावर जाऊन तणनाशक  प्राशन केले. त्यांचा जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना रात्री एकच्या सुमारास मृत्यू झाला. त्यांच्याव महाराष्ट्र बँक आणि सोसायटीचे कर्ज होते.  
 
सिमरगव्हाणचे कैलास उगले (२५) या तरुण शेतकऱ्याने  शेतातील लिंबाच्या झाडाला शुक्रवारी सकाळी गळफास घेतला. त्यांना प्रथम पाथरीतील  खासगी  आणि  मानवत येथील खासगी रुग्णालयात हलवले. मात्र, उपचार सुरू असतानाच सायंकाळी पाच वाजता  त्यांचे निधन झाले.    पाथरगव्हाण येथील परमेश्वर बन्सीधर घांडगे (४५) यांनी सकाळी  घरातील माळवदाच्या कडीला गळाफास घेतला. तर   झाडगाव (ता. परभणी) येथील तरुण शेतकरी गोपाळ रामराव ढगे (२७) याने शनिवारी (दि.२७) दुपारच्या सुमारास विष घेतले.   जिल्हा  रुग्णालयात त्यांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला.
बातम्या आणखी आहेत...